शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: August 18, 2017 12:21 IST

आवश्यक वस्तूंचीच खरेदी : वाढत्या दरांनी साज-साहित्यांचीही मागणी घटली

ठळक मुद्देसाहित्यांच्या किमतीतही झाली वाढ पोळा सण म्हटला म्हणजे शेतकरी आपल्या बैलाला आकर्षक पध्दतीने सजवत असतात़ यात विविध पारंपारिक पध्दतीच्या साहित्यांचा वापर करुन आपल्या जिवाभावाच्या साथीदाराला देखने रुप देत असतात़ परंतु सध्या या साहित्यांच्या किंमतीदेखील वाढल

ऑनलाईन लोकमतदिनांक 18 ऑगस्टनंदुरबार : पावसाअभावी पोळा हा सण दुष्काळाच्या छायेत सापडला असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आह़े परंतु माफक प्रमाणात का होईना बळीराजा शेतातील आपल्या सच्चा साथीदाराच्या कृतज्ञतेपोटी हा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाली   आह़े शेतक:यासोबतच बैल वर्षभर आपल्या मालकाची साथ देत असतो़ त्यामुळे आपल्या या जिवाशिवाच्या साथीदाराच्या उपकाराची जाण ठेवत शेतकरी मोठय़ा उत्साहात पोळा  सण साजरा करीत असतात़ परंतु सध्या अर्धा पावसाळा उलटण्यात आला तरीदेखील जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पोळा साजरा तरी कसा करावा? अशी चिंता आता शेतक:यांना सतावत आह़े यंदा पावसाळा लवकर असल्याने पहिल्या एक-दोन पावसातच शेतक:यांनी पेरणीला सुरुवात केली होती़ परंतु नंतर पावसाने तडी दिल्याने शेतक:यांचा पुरता भ्रमनिरास झाला आह़े कर्ज काढत केलेली पेरणी आता डोईजड होऊ लागली आह़े भरपूर पावसाने उत्पन्नही समाधानकारक असेल अशी शेतक:यांची अपेक्षा होती़ परंतु सर्व अपेक्षांवर पाणी फेरले असल्याच्या व्यथा शेतकरी मांडत आह़े त्यामुळे अशा परिस्थितीत पोळ्यासाठी लागणारा साज-श्रृंगार घ्यावा कसा व हा सण साजरा करावा कसा असा प्रश्न शेतक:यांसमोर उभा ठाकला आह़ेपावसाचे दिवसेंदिवस कमी होणारे प्रमाण तसेच यामुळे निर्माण होणारा दुष्काऴ या आसमानी संकटामुळे शेतक:यांना आपल्या शेतात राब-राब राबणा:या आपल्या साथीदाराला विकावे लागत आह़े त्याच प्रमाणे शेती क्षेत्रामध्ये वाढते आधुनिकीकरण, वाहनांचा वापर यामुळे आधी एका सालदाराकडे असणारी बैलांची दहा जोडी आता मोठय़ा मुश्किलीने एक दिसून येत आह़े त्यामुळेदेखील पूर्वी पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणारा हा सण आता काही प्रमाणात लोप पावत आहे की काय अशी भिती व्यक्त होत आह़े एकीकडे दुष्काळ सदृष परिस्थिती तर दुसरीकडे बैलांच्या सजावटीच्या सामानाची वाढती किंमत यामुळे शेतकरी माफक प्रमाणात का होईना परंतु आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सज्ज झाला आह़े