शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात गर्दी

By admin | Updated: March 24, 2017 00:17 IST

डॉक्टरांवरील वाढते हल्ले व त्यावर उपाययोजना करण्यात आलेले अपयश याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

 

नंदुरबार : डॉक्टरांवरील वाढते हल्ले व त्यावर उपाययोजना करण्यात आलेले अपयश याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वच लहान, मोठे हॉस्पिटल  गुरुवारी बंद होते. परंतु अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल झाले. परिणामी शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये  रुग्णांची गर्दी झाली  होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात डॉक्टरांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. शासन त्यावर उपाययोजना करण्यात दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे डॉक्टरांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. यावर सक्तीची उपाययोजना करावी यासह इतर मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे रुग्णालये बंद ठेवून संप पुकारण्यात आला. त्याला निमा, आयडीए, एचआयएमए, माडा व युनानी डॉक्टर असोसिएशनने पाठिंबा दिला. बुधवारी दुपारपासून जिल्हाभरातील खासगी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला आहे. गुरुवारीदेखील संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात डॉक्टर्स व हॉस्पिटलवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ले होत आहेत. शिवाय शासनाने निवासी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला. शासन याबाबत ठोस पावले उचलत नाहीत. अशा दहशतीच्या वातावरणात डॉक्टरांना पेशंटच्या हिताचा योग्य निर्णय घेणे व उपचार करणे शक्य होत नसल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागत आहे. रुग्णांच्या गैरसोयीबद्दल असोसिएशनला खेद असून, अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली असल्याचे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकावर आयएमए, निमा, आयडीए, एचआयएमए, माडा व युनानी डॉक्टर असोसिएशन अध्यक्षांच्या सह्या आहेत.संघटनेचे सर्वच सदस्य सहभागीइंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाभरात दीडशेपेक्षा अधिक सदस्य आहेत. शिवाय संलग्न संघटनादेखील आहेत. असोसिएशनच्या आवाहनानुसार सर्वच सदस्यांनी संपात सहभाग घेतला. त्यामुळे जिल्हाभरातील लहान, मोठी सर्वच रुग्णालये गुरुवारी सकाळपासूनच बंद होती. सर्वच डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बंदचे बोर्ड लावले होते. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे रुग्ण येऊन फिरून जात होते. जे रुग्ण आधीपासूनच आॅपरेशन करून किंवा इतर उपचारासाठी दाखल आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु बुधवारी दुपारपासून बाह्यरुग्ण (ओपीडी) विभाग बंदच ठेवण्यात आला.शासकीय रुग्णालयात गर्दीजिल्हा रुग्णालयात तसेच आरोग्य केंद्रांमध्ये यामुळे मात्र रुग्णांची गर्दी वाढली होती. खासगी रुग्णालयात आलेले रुग्ण नंतर थेट जिल्हा रुग्णालयात जात होते. परिणामी जिल्हा रुग्णालयातील ओपीडी गुरुवारी वाढली होती. संप लक्षात घेता जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना स्थानिक ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे. सुटीही रद्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी दिली.डॉक्टरांचा संप लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात पर्याप्त व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी जिल्हा रुग्णालयातील ओपीडी वाढण्याची अपेक्षा होती. परंतु फारसा फरक पडलेला नाही. सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना स्थानिक ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे.-डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.