शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दरडी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 17:03 IST

चांदसैली व देवगोई घाट : अनेक वाहनधारक जायबंदी, उपाय योजना गरजेची

कोठार : सातपुडा पर्वत चांदसैली व देवगोई घाटात अनेक ठिकाणी रविवारी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली असून घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे.दरवर्षी पावसाळ्यात सातपुडय़ातील सर्व घाटमार्गात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात़ या वर्षीदेखील सातपुडय़ातील अक्कलकुवा-मोलगीला जोडणा:या देवगोई घाट, तळोदा-धडगांव दरम्यानचा चांदसैली घाट या प्रमुख घाटाव्यतिरिक्त भरडीपादर ते कुवा दरम्यानचा घाट, कुंडी ते होराफळी दरम्यानचा घाट, दहेलचा घाट, या घाटातदेखील दरळी कोसळल्या आहेत. यातील देवगोई व चांदसैलीच्या घाटात सर्वाधिक वाहतुकीची वर्दळ असते. दरडी कोसळल्याने रस्त्यावर लहान-मोठे दगड पडलेले दिसून येत आहे. बारीक मुरून व मातीचे ढिगारे देखील निर्माण झाले आहे. सातपुडय़ाच्या पर्वत रांगामध्ये तुरळक पावसाची रिपरिप मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे कोसळलेल्या दरडीच्या दगड-मातीमुळे घाटमार्गात अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. घाटातील तीव्र चढाव-उतार व त्यातच दरडीच्या मातीमुळे निर्माण झालेला चिखल या परिस्थितीमुळे वाहने घसरण्याची शक्यता असते. अनेकदा दरडी कोसळल्याने रस्त्यावर दगड व बारीक मुरूम पसरतात़ त्यामुळेदेखील अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात़या सर्व परिस्थितीमुळे घाटातील वाट अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना या अपूर्ण ठरत आहे. काही ठिकाणी घाट मार्गात डोंगराच्या कडेला जेसीबीने चारी खोदून पाणी प्रवाहित करण्याच्या प्रय} केलेला आह़े तर काही ठिकाणी दरडी कोसळू नयेत यासाठी पक्क्या संरक्षक भिंती बांधल्या असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी दरळी कोसळल्या तर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी दरडीचे दगड व माती हटविण्यासाठी जेसीबी उपलब्ध असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. परंतु जेसीबी उपलब्ध असतांना देखील घाटात अनेक ठीकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर निर्माण झालेले दगड व माती ढिगारे हटविण्यात आलेले नसल्याची स्थिती आहे. या ठिकाणी प्रशासनाने दरडी कोसळू नये म्हणून नेटच्या जाळ्या लावाव्यात अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आह़े वास्तविक आपत्ती व्यवस्थापन विभागा व सार्वजनिक बांधकाम विभागा यांनी समन्वय साधत पावसाळ्यापूर्वीच ही कामे करणे गजरेची होती़ परंतु तसे न झाल्याने या समस्या निर्माण होत  आह़े