नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे़ त्यामुळे रब्बी हंगामातील प्रमुख पिक म्हणून गणल्या जाणाºया हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे़ त्यामुळे शेतकºयांकडून किडनाशक फवारणी करण्यात येत आहे़तळोदा तसेच शहादा परिसरात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे़ यंदा थंडीचा प्रभावदेखील बºयापैकी राहिल्याने ठिकठिकाणी हरभरा पिकाची जोमात वाढ झालेली दिसून येत आहे़ रब्बी हंगामातील प्रमुख पिक म्हणून हरभरा पिकाकडे पाहण्यात येत असते़ यंदा समाधानकारक पाऊस झाला नसला तरी ग्रामीण भागात चांगला गारठा निर्माण झाला होता़ हे सर्व वातावरण हरभºया पोषक असले तरी गेल्या चार ते पाच दिवसांपसून जिल्ह्यात बºयापैकी ढगाळ वातावरण दिसून येत आहे़ त्यामुळे हे सर्व हरभरा पिकाला मारक असून घाटेअळीला मात्र पोषक आहे़ढगाळ हवामान असल्यास घाटेअळीची वाढ जोमात होत असते़ त्यामुळे हरभरा पिकाचा दर्जा खालावत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे याचा परिणाम म्हणून नंदुरबारसह खान्देशात ढगाळ हवामानाचा प्रभाव दिसून येत आहे़ त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकºयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ओल्या हरभºयावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होऊन ही अळी संपूर्ण हरभरा पोखरत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे याचा परिणाम हरभरा पिकाच्या दर्जावर होत आहे़ शेतकºयांकडून आपले पिक वाचविण्यासाठी हरभरा पिकावर किडनाशकाची फवारणी करण्यात येत आहे़ अजून काही दिवस ढगाळ हवामान राहिल्यास शेतकºयांच्या हरभरा पिकाचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे़
ढगाळ हवामानामुळे नंदुरबारात घाटेअळीची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:22 IST