शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

मिरची आवक झाली यंदा दुप्पट

By admin | Updated: March 4, 2017 00:58 IST

नंदुरबार : मिरची हंगाम यंदा संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट खरेदी झाली आहे.

नंदुरबार : मिरची हंगाम यंदा संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट खरेदी झाली आहे. आतापर्यंत दोन लाख ५५ हजार क्विंटल मिरची खरेदी झालेली आहे. हंगाम संपेपर्यंत तीन लाख क्विंटलपर्यंत आकडा जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंदीमुळे भावदेखील समाधानकारक दिला जात नसल्यामुळे शेतकºयांमध्येही फारसे समाधानाचे वातावरण नसल्याची स्थिती आहे.नंदुरबार हे मिरचीचे आगार म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. मध्यंतरी गेल्या आठ ते दहा वर्षात मिरचीची आवक कमी झाली होती. त्यामुळे येथील व्यापाºयांना आणि मिरची प्रक्रिया उत्पादकांना बाहेरून मिरची मागवावी लागत होती. परंतु यंदा मिरचीचे क्षेत्र दुप्पटीने वाढल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणावर झाली. अगदी हिरवी मिरचीदेखील बाजार समितीत प्रथमच विक्रीस आली   होती.गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्तयंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने आवक झाली आहे. गेल्यावर्षी एक ते सव्वा लाख क्विंटल मिरची आवक झाली होती. यंदा हंगाम संपण्याअगोदरच तब्बल अडीच लाखापेक्षा अधिक आवक झाली आहे. आणखी दोन ते तीन आठवड्यात ४० ते ४५ हजार क्विंटल आवक गृहीत धरली तर यंदा तीन लाख क्विंटल आवक होण्याची अपेक्षा आहे. ही आवक गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक राहणार आहे. सध्या दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल आवक सुरू आहे. हंगामाच्या सुरुवातीला हीच आवक चार ते पाच हजार क्विंटलपर्यंत जात होती. हंगामाच्या शेवटपर्यंत ती दैनंदिन दीड हजार क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.भाव दोलायमानयंदा मिरचीचे भाव दोलायमान राहिले. सुरुवात मिरचीच्या प्रतवारीनुसार १२०० ते १९०० रुपये क्विंटलपर्यंत होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन २२०० रुपयांपर्यंत गेले. सध्यादेखील १४०० ते २२०० रुपये क्विंटल दरम्यान भाव दिला जात आहे.व्यापारी घटलेसुरुवातीला मिरची खरेदी करणाºया व्यापाºयांची संख्या १५ पेक्षा अधीक होती. परंतु यंदा मिरचीची आवक व त्यानुसार झालेली खरेदी लक्षात घेता काही व्यापारी कमी झाले. त्यामुळे आताच्या स्थितीत केवळ सात ते आठच व्यापारी खरेदीदार आहेत. त्यामुळे मिरची खरेदीच्या आणि उलाढालीतदेखील परिणाम झाला आहे. मंदीचे सावटयंदा मिरची उलाढालीत मंदीचे सावट कायम राहिले. हंगामाच्या सुरुवातीलाच नोटा बंदीमुळे खरेदी काही दिवस बंद राहिली. त्यामुळे शेतकºयांना आपल्या शेतातच    मिरची वाळवावी लागली. त्यानंतर खरेदी-विक्रीला सुरुवात झाली असली तरी मंदीचे सावट कायम    होते. शेतकºयांना रोखीने पेमेंट ऐवजी चेकद्वारे ते दिले जात होते. चेकदेखील बँकामध्ये रोख रक्कमेच्या अभावामुळे दोन ते तीन आठवडे  वटतच नव्हते. परिणामी शेतकºयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.दोंडाईचा मार्केटबंद दोंडाईचा मार्केटमधील मिरची खरेदी कमी झाली आहे. तेथे देखील खरेदीदार व्यापारी नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.परिणामी त्या भागातील लाल मिरचीदेखील नंदुरबार बाजार समितीत येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली.मिरचीच्या दाहकतेचा वाहनचालकांना त्रासमिरची व्यापाºयांच्या पथारीचा वाद पुढील वर्षी ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. मिरची पथारी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती झाली आहे. शिवाय वळण रस्तादेखील गेला आहे. त्यामुळे मिरचीच्या दाहकतेचा त्रास होत आहे. पूर्वी या भागात नागरी वस्ती नव्हती. वळण रस्त्यावरदेखील फारशी रहदारी राहत नव्हती. आता परिस्थितीत बदल झाला आहे. सध्या कडक ऊन पडत असल्यामुळे आणि वाºयाचा वेग जास्त राहत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय परिसरातील वसाहतींमध्ये राहणाºया लोकांनादेखील मिरचीच्या दाहचा त्रास होऊ लागला आहे. आधीच या भागातील नागरिकांनी मिरची पथारी इतरत्र हलविण्याची मागणी केली होती. परिणामी पुढील वर्षी ही समस्या आणि जागेचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.