शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्राकडील वा-यांमुळे नंदुरबारातील आद्र्तेत 24 टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जसजसा मान्सून जवळ येतोय तसे वातावरणात मोठे बदल होताना दिसत आह़े बुधवारी आद्र्रतेत तब्बल 24 टक्क्यांनी वाढ होऊन ती 55.6 टक्क्यांवर जाऊन पोहचली़ तर तापमानात मात्र दोन अंशांनी घट बघायला मिळाली़ बुधवारी तापमान 40 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आल़े अरबी समुद्राकडून येणा:या वा:यांमुळे आर्द्रतेत वाढ होत असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जसजसा मान्सून जवळ येतोय तसे वातावरणात मोठे बदल होताना दिसत आह़े बुधवारी आद्र्रतेत तब्बल 24 टक्क्यांनी वाढ होऊन ती 55.6 टक्क्यांवर जाऊन पोहचली़ तर तापमानात मात्र दोन अंशांनी घट बघायला मिळाली़ बुधवारी तापमान 40 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आल़े अरबी समुद्राकडून येणा:या वा:यांमुळे आर्द्रतेत वाढ होत असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े तसेच वातावरण अंशत: ढगाळ राहणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आल़े 10 जूनर्पयत नंदुरबारसह संपूर्ण खान्देशात तापमानापेक्षा आर्द्रतेचा प्रभाव जास्त राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आल़े मान्सून केरळात दाखल झाला आह़े 6 ते 7 जूनर्पयत तो मुंबईसह कोकणात दाखल होणार आह़े वेळेआधीच मान्सून मराठवाडय़ात दाखल झाला असल्याने वातावरणात कमालीचे बदल जाणवत आहेत़ आद्र्रतेमुळे मान्सूनचे वेध लागण्यास सुरुवात झाली असली तरी यामुळे उकाडय़ात कमालीची वाढ झाली आह़े यंदाच्या मोसमात सर्वाधिक आद्र्रता मे महिन्याच्या सुरुवातीला 31 टक्के इतकी होती़ परंतु बुधवारी हा उच्चांक मोडीत काढत आद्र्रता तब्बल 24 टक्क्यांनी वाढून 55.6 टक्के इतकी नोंदविण्यात आली आह़े हवेतील पाण्याच्या अंशाला आद्र्रता असे म्हणतात़ हवेत पाण्याचा अंश जेवढा जास्त तेवढी आद्र्रता जास्त नोंदविण्यात येत असत़े तसेच आद्र्रता जेवढी जास्त तेवढा उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे अरबी समुद्रालगत असलेल्या मुंबई तसेच कोकण परिसरात सर्वसाधारणपणे आद्र्रतेचे प्रमाण सर्वाधिक असत़े  सर्वसाधारणपणे समुद्री भागात आद्र्रतेचे प्रमाण अधिक असत़े त्यामुळे समुद्राकडून वाहून येणारे वारे साहजिकच आपल्यासोबत  आद्र्रतासुद्धा घेऊन येत असतात़ त्यामुळे अरबी समुद्राकडून येणा:या वा:यांचा प्रभाव सध्या मराठवाडय़ासह खान्देशात वाढत असल्याने साधारणत: 10 जूनर्पयत वातावरणात आद्र्रता कमी-अधिक प्रमाणात कायम राहणार असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े  बुधवारी संपूर्ण खान्देशचा विचार करता सर्वाधिक आर्द्रता ही नंदुरबारात नोंदविण्यात आली आह़े जळगाव व धुळे  येथे अनुक्रमे  37.6 व 35 टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली आह़े त्यामुळे बुधवारी नंदुरबारकरांना सर्वाधिक उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागला़ वाढत्या उकाडय़ाने कधी एकदा पावसाळा लागतोय अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होतेय़सध्या नंदुबारात ताशी 29 प्रती कि.मी. वेगाने वारे वाहत आहेत़ रात्रीच्या  वेळी वा:यांचा वेग जास्त आह़े त्यामुळे मध्यरात्री काहीशी आल्हाददायक थंडी जाणवत असल्याचा अनुभव नागरिक सांगतात़ दरम्यान, मान्सून जवळ येत असल्याने मान्सून येईर्पयत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे नंदुरबारसह खान्देशातील    तापमानसुद्धा ब:यापैकी स्थिर राहणार आह़े तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यतासुद्धा कमी राहणार असल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबारातील तापमान 40 ते 42 अंशावर स्थिर राहणार आह़े