शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी झळातही सातपुड्याची केळी निघाली ‘सौदी’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:23 IST

नंदुरबार : यंदा दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे चेहरे कोमेजायला आले असतानाच रक्ताचे पाणी करुन केळीची जोपासना करणाºया सुमारे १०० पेक्षा ...

नंदुरबार : यंदा दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे चेहरे कोमेजायला आले असतानाच रक्ताचे पाणी करुन केळीची जोपासना करणाºया सुमारे १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची केळी सौदी अरेबियात निर्यात झाली आहे़ आतापर्यंत जवळपास ११० कंटेनर रवाना झाले असून महिनाभरात १५० पेक्षा अधिक कंटेनर केळी सातासमुद्रापार जाणार आहे़जिल्ह्यात ऊसाबरोबरच पपई, मिरची आणि केळी हे बागायती पिके घेतली जातात़ शेतकºयांनी आधुनिकतेची कास घेत शेती हायटेक केली आहे़ त्याचे चांगले परिणाम गेल्या काही वर्षापासून दिसत आहेत़ विशेषत: केळी उत्पादक शेतकºयांनी धाडस करुन निर्यातीसाठी पुढाकार घेतला़ त्यासाठी काही कंपन्यांशी समन्वय साधून तज्ञाच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी गट तयार केला़ या गटात मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी सहभाग घेतला आहे़ सुमारे १०० पेक्षा अधिक शेतकºयांनी जवळपास १२ लाख केळीच्या रोपांची लागवड केली होती़ त्याचे उत्पादन सुरु झाले असून ही केळी आता, निर्यात होऊ लागली आहे़ ब्राह्मणपुरी, पाडळदा, म्हसावद यासह इतर गावातील शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत़ यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे़ त्यामुळे पिके वाचवणे शेतकºयांसाठी अवघड होत असून अशा बिकट परिस्थितीतही केळी उत्पादक शेतकरी केळीची जोपासना करण्यात दिवसरात्र एक करीत आहेत़ त्याचे फलीत त्यांना दिसू लागले असून या केळींच्या बागांपुढे आता निर्यातीसाठी कंटेनर लागू लागले आहेत़ विशिष्ट पद्धतीने केळीच्या घडाची कापणी करुन त्यावर प्रक्रिया करीत केळीची पॅकिंग केली जात आहे़ यातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे़