शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

मालमत्तापत्रकासाठी 60 गावांमध्ये ड्रोनद्वारे सव्रेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील गावठाणांच्या  जमिनींचे जीआयएस आधारित सव्रेक्षण व मॅपिंग करुन पालिकांच्या धर्तीवर मालमत्तापत्रक देण्याचा निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील गावठाणांच्या  जमिनींचे जीआयएस आधारित सव्रेक्षण व मॅपिंग करुन पालिकांच्या धर्तीवर मालमत्तापत्रक देण्याचा निर्णय घेतला गेला आह़े निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून जिल्ह्यातील 60 गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ड्रोनद्वारे सव्रेक्षण होणार आह़े यातून सिमांकन व गावठाण हद्द समजून येणार आह़े शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या सव्रेक्षण कार्यक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार ग्रामीण मालमत्ताधारकांना नमुना आठऐवजी मालमत्तापत्रक मिळण्याचा मार्ग होणार आह़े ग्रामीण भागात नागरिकांच्या स्थावर मालमत्तेला नमुना आठ देऊनही कर्ज घेण्याची सुविधा मिळत नव्हती़ तसेच मिळकतीला योग्य तो मोबदलाही दिला जात नव्हता़ यामुळे शासनाने मालमत्तांचे संरक्षण होऊन सिमांकन निश्चिती करण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांना मालमत्तापत्रक देण्याचा निर्णय घेतला होता़ या निर्णयाची निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणी सुरु झाली आह़े यात नंदुरबार जिल्ह्यातील साधारण दोन लाख खातेधारकांना हक्काचे मालमत्तापत्रक मिळणार आह़े ड्रोनद्वारे होणा:या सव्रेक्षणानंतर स्थानिक ग्रामसभा घेण्याचेही निश्चित करण्यात आले आह़े ग्रामसभेतून मोजणी कार्यक्रमाची माहिती दिली जाईल़ शासनाकडून होणा:या या मोजणीमुळे शासकीय मिळकतीचे संरक्षण, मिळकतीचा नकाशा व सीमा निश्चिती, मिळकतीच्या नेमक्या छायाचित्राची माहिती, मालकी हक्काचे अभिलेख मिळकत पत्रिका, ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण, गावातील रस्त्यांचे अचूक नकाशे, नाल्यांच्या सीमा निश्चित होणार, अतिक्रमणाला चाप बसणार आणि मिळकत पत्रिकेमुळे घरांवर कर्ज घेणे सुलभ होणार आह़े सव्रेक्षणानंतर देण्यात येणा:या पत्रकामुळे बाजारपेठेत तरलता येऊन गावांची आर्थिक पत उंचावण्यास मदत होणार असल्याचे भूमीअभिलेख विभागाने सांगितले आह़े 

महसुली गावांमध्ये गावठाणाचे ड्रोनद्वारे होणा:या नगर भूमापन मोजणीकरता नंदुरबार जिल्ह्यात 60 गावे प्रस्तावित आहेत़ यात नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, उमर्दे खुर्द, वाघोदे, नळवे खुर्द, धमडाई, पथराई, लोणखेडा, पळाशी, दुधाळे, राकसवाडे, नवापुर तालुक्यातील निंबोणी, नगारे, पिंपळे, कारेघाट, पिंप्राण, निमदर्डा, पानबारा, खोकसा, नांदवण, कासारे, शहादा तालुक्यातील टेंभली, अलखेड, लोहारे, मनरद, सोनवद तर्फे शहादा, औरंगपूर, मोहिदे तर्फे हवेली, मलगाव, मानमोडय़ा, कुकावल, तळोदा तालुक्यातील त:हावद, खेडले, धानोरा, दसवड, रांझणी, सोमावल बुद्रुक, नर्मदानगर, कढेल, आष्टे तर्फे बोरद, उमरी, अक्कलकुवा तालुक्यातील कोराई, मक्राणीफळी, मिठय़ाफळी, वाण्याविहिर खुर्द, सोरापाडा, गंगापूर, वाण्याविहिर बुद्रुक, राजमोही मोठी, राजमोही लहान, देवमोगरा नगर तर धडगाव तालुक्यातील तोरणमाळ या एकमेव गावाचा समावेश करण्यात आला आह़े या गावांमध्ये त्या-त्या तालुक्यातील भूमीअभिलेख विभागाचे उपअधिक्षक ड्रोनद्वारे सव्रेक्षण राबवणार आहेत़

सव्रेक्षणांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावात आठ टप्प्यात कामकाज होणार आह़े यात प्रथम गावठाणाची हद्द मोजणी करुन निश्चिती करणे, ग्राउंड कंट्रोल पॉईंट प्रस्थापित करणे, गावातील रस्त्यांचे सिमांकन करणे, ड्रोनद्वारे गावठाणांचे छायाचित्रण करणे, या छायाचित्रांचे प्रोसेसिंग करुन मिळकतीचे नकाशे तयार करणे, नकाशा आधारे हक्क चौकशी काम करणे, नगर भूमापन अभिलेख तयार करणे, मिळकत पत्रिका नकाशे आदी तसेच सनद वाटप करणे आदी अपेक्षित आह़े ग्रामसभा सुरु झाल्यानंतर तात्काळ ही कामे सुरु होतील़