१८ जूनला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नंदुरबार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि त्यांच्या पथकाने येथील धुळे-सुरत महामार्गावर नाकाबंदी करून मध्य प्रदेशातून गुजरात राज्यात विनापरवाना, कर चुकवून, अवैधरीत्या लाखो रुपयांची बीअर घेऊन जाताना दोन ट्रकचालकांना मुद्देमालासह अटक केली. त्यांच्याकडून ट्रकसह १८ लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी विसरवाडी पोलिसांनी चालक रामकृष्ण पंडित पाटील (वय २६, रा. वराड, धरणगाव जि. जळगाव) व सुनील श्रीराम पाटील (वय ४०, रा. बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना अटक करून नवापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये चोरट्या मार्गाने दारू, बीअर घेऊन जाणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होणे आवश्यक असून, या अवैध व्यवसायांमगील खरे सूत्रधार कोण? हे समजणे अत्यावश्यक आहे.