शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्रांतीमुळेच विदेशी कंपन्यांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:11 IST

पारंपारिक बियाणे संवर्धन चर्चासत्र : केंद्रीय कृषी राज्यमंत्री रुपला यांचे प्रतिपादन

नंदुरबार : कृषी क्रांतीच्या नावाखाली आपणच विदेशी बियाणे कंपन्यांना भारतात आणले. कृषी उत्पादन वाढीसाठी तेंव्हा ते आवश्यक होते. परंतु आता भारतातील कृषी तज्ज्ञांनी विविध वाण विकसीत केले आहेत. पारंपारिक बियाण्यांमध्ये संशोधन होत आहे. त्यामुळे हायब्रीड बियाणे घ्यायचे की आपले पारंपारिक बियाण्यांचे अधीक संवर्धन करायचे हे ठरविणे आपल्या हातात असल्ययाचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी पारंपारिक बियाण्यांचे जतन व संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपात बोलतांना केले.दोन दिवशीय चर्चासत्राचा समारोप रविवारी सायंकाळी राज्यमंत्री रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथा, हेडगेवार सेवा केंद्राचे कृष्णदास पटेल, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.गजानन डांगे, मनोज सोलंकी आदी उपस्थित होते. समारोपाच्या भाषणात राज्यमंत्री रुपाला यांनी सांगितले, केंद्र व राज्य सरकारने शेतक:यांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा सामान्य शेतक:यांनी घेणे आवश्यक आहे. लहान शेतक:यांना कमी क्षेत्रात अपेक्षीत शेती उत्पादन घेता येत नाही. यासाठी गट शेतीचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या माध्यमातून मोठय़ा क्षेत्रात विविध पीक उत्पादन घेतले जाते. त्यातून उत्पादीत होणा:या मालावर प्रक्रिया केल्यास त्यावर आयकर माफ करण्यात आलेला आहे. या माध्यमातून व्यापारी शेतक:यांच्या बांधार्पयत येवून कृषी माल खरेदी करू शकणार आहे. उत्पादन खर्चावर आधारीत किमान आधारभूत किंमत केंद्र शासनाने ठरविली आहे. त्याचा चांगला फायदा शेतक:यांना होत आहे. शेतक:यांना आंदोलनाला उकसविणा:यांना पीकाचे उत्पादन कसे करावे याची माहिती तरी आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतीमध्ये मॅनेजमेंट हा प्रकार गेल्या काही वर्षापासून आला आहे. अशा प्रकारे शेती कराल तर नुकसान होईलच असे सांगून ते म्हणाले, 1980 च्या दशकार्पयत शेतात मजूर हा प्रकारच नव्हता. कुटूंबातील व्यक्तीच शेती करीत होते. कुटूंबातील व्यक्तींचा सूर्योदय हा शेतातच होत होता. आता मात्र मजुरांवर शेती अवलंबून आहे. कुटूंबातील व्यक्ती केवळ देखरेख करीत आहे. मजूर सकाळी नऊ वाजता येतो, सायंकाळी पाच वाजता निघून जातो. कसे पिकांचे संवर्धन होईल, कसे उत्पादन वाढेल असेही त्यांनी सांगितले. शेतीतून श्रम निघून गेले आहे. कमी श्रमात, कमी वेळेत जास्त उत्पादनाची अपेक्षा कराल तर नुकसान होईलच असेही त्यांनी सांगितले. खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, नंदुरबार सारख्या भागात पारंपारिक बियाण्यांचे जतन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. आधुनिक आणि पारंपारिक या दोन्हींचा मेळ घालत आमचा शेतकरी शेती उत्पादन घेत आहे. जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विविध शेतीउपयोगी प्रयोग केले जात आहे. जमीन आरोग्य पत्रिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा फायदा पीक नियोजनात केला जात आहे. सेंद्रीय शेतीला आजही आमचा आदिवासी शेतकरी प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. सीड बँकेच्या माध्यमातून देखील पारंपारिक वाणांचे जतन केले जात असल्याचे खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले. डॉ.गजानन डांगे यांनी चर्चासत्राच्या माध्यमातून मिळालेल्या उपलब्धीबाबत विवेचन केले. सूत्रसंचलन डॉ. बी.गुणाकार यांनी केले तर आभार कृष्णदास पटेल यांनी मानले.