लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी डिस्ट्रीक कल्चरल अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या देशक्तीपर नृत्य व गीत गायन स्पर्धेत यश मिळविले.या वेळी नृत्य स्पर्धेत व्दितीय प्राप्ती भट, स्वरा साळी, दिशा पाटील, तनुश्री माळी, कसक दिवाण, गुंजन बजाज, एकता भोये, इशिता गावीत, दिप्ती गिरासे, धनश्री बाविस्कर, चंचल मराठे, भूमी परदेशी, काजल सोनवणे, रिया दातीर, जिज्ञासा ठाकूर, लब्धी जैन, जान्हवी भोई, ग्रिष्मा कापसे, दुर्वा चौधरी व इशिका पाडवी तर देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत तृतीय वैष्णवी लुळे, दामिनी पाटील, जान्हवी पगारे, साक्षी जाधव, भाविनी सावळे, जागृती अहिरराव, माधवी कापुरे, प्रियांशु चौधरी, सृष्टी परदेशी व आकांक्षा भिलाणे आल्या.या विद्यार्थिनींना शिक्षीका नंदिनी बोरसे, सीमा गावीत, स्वाती कुळकर्णी, चंद्रशेखर चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड.परीक्षित मोडक, चेअरमन गिरीश खुंटे, उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्य-सदस्या, मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, पर्यवेक्षक नारायण भदाणे व सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गीतगायन व नृत्य स्पर्धेत डॉ.काणे हायस्कूलचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:46 IST