शाळेतून दहावीच्या परीक्षेसाठी २४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा शेकडा निकाल १०० टक्के लागला. त्यात विशेष प्राविण्य श्रेणीत ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेत केतन बोरसे (९७.४० टक्के) प्रथम, द्वितीय चैतन्य शुक्ल (९४.२० टक्के) तर तृतीय क्रमांक कृष्णा पाटील (९१.४० टक्के) याने पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष ॲड.परीक्षित मोडक, उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारणी सदस्य पंकज पाठक, श्रीराम मोडक, उपमुख्याध्यापक नारायण भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सत्कार शाळेमार्फत करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालकांनी मनोगतातून शाळेविषयी अनुभव व शिक्षकांचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन सीमा मोडक यांनी तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले.
डी.आर. हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST