कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:49 PM2019-11-12T12:49:55+5:302019-11-12T12:50:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : वर्षातून एकदा उघडणारे कार्तिक स्वामींचे मंदिर सोमवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी उघडण्यात आले. ...

The doors of Kartik Swami's temple opened | कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे उघडले

कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे उघडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : वर्षातून एकदा उघडणारे कार्तिक स्वामींचे मंदिर सोमवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी उघडण्यात आले. मंदिर उघडल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
प्रकाशा, ता.शहादा येथे कार्तिक स्वामींचे एकमेव मंदिर असून, ते वर्षातून  एकदा उघडत असते. या मंदिरावर दर्शनासाठी या पंचक्रोशीतील भाविक गर्दी करत असतात. याप्रसंगी अनुचित प्रकार  घडू नये यासाठी शहादा उपविभागीय  पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक    किसनराव नजन पाटील यांनी भेट देत मंदिर ट्रस्टींना दोन दिवसांसाठी सीसीटीव्ही कॅमेर लावण्याच्या  सूचना दिल्या आहेत. याठिकाणी दोन दिवस भाविकांची होणारी गर्दी  लक्षात घेता पोलीस प्रशासनातर्फे ट्रस्टींना विविध सूचना देण्यात  आल्या.
दर्शन घेतल्यानंतर भाविकांना मंदिराच्या मागील बाजूनेच रवाना करावे. जेणेकरून या ठिकाणी गर्दी होणार नाही व येणा:या भाविकांना सहज दर्शन घेता येईल. मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर गाभा:यात व मंदिराबाहेर ट्रस्टींनी दोन दिवस भाडय़ाने सीसीटीव्ही कॅमेरे आणून  बसवावेत, अशी सूचना दिली. परिसरातील दुकाने वाहनतळाचे नियोजन कसे आहे याची पाहणीही केली.
 


मंदिर परिसरात सोमवारपासून दुकान थाटण्यास सुरूवात झाली आहे. याठिकाणी रसवंती, पूजेचे साहित्य, नारळ विक्रेते, मनोरंजन साहित्यासह विविध देवतांचे फोटो आदी दुकाने लावण्यात आले आहे. मोरपीस विक्री करणारे सर्वात जास्त दुकान या परिसरात दिसून आलेत. या वेळी भाविकांकडून कार्तिक स्वामींना मोठय़ा प्रमाणावर मोरपीस चढविले जात असून, त्यातील दोन मोरपीस घरी घेऊन जात असतात.
4मंदिर ट्रस्टींकडून भाविकांच्या सोयीसाठी याठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गणेश व देवीच्या मंडळातर्फे प्रसाद वाटपासह पाण्याची सोय करण्यात आली आहे.
 

Web Title: The doors of Kartik Swami's temple opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.