नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद पडलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या आहेत. परंतु विदर्भ ते गुजरात अशी जोडणी करणारी अमरावती पॅसेंजर मात्र सुरू करण्यात आलेली नाही. ही गाडी सुरू कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. ही रेल्वेगाडी बंद असल्याने इतर गाड्यांवर प्रवासी संख्येचा ताण वाढला आहे.
वाढत्या डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमुळे खासगी आणि एसटीमधून प्रवास करणे सध्या प्रवाशांना परवडणारे नाही. यातून रेल्वेगाड्यांना प्रवासी वाढत आहेत. यातून उधना-जळगाव मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या आहेत. परंतु अमरावती पॅसेंजर मात्र बंद आहे.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
चेन्नई-अहमदाबाद नवजीवन
हावडा-अहमदाबाद
भुसावळ-बांद्रा खान्देश एक्स्प्रेस
सुरत-वाराणसी ताप्तीगंगा
मग पॅसेंजर बंद का?
एका बाजूने निर्बंध शिथिल होत आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या एस. टी. महामंडळाच्या बसेसही धावू लागल्या आहेत. मात्र, प्रवाशांची अधिक पसंती व गरजेची असलेली अमरावती पॅसेंजर कोरोनोचे कारण देत बंद ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाने सर्व पॅसेंजर गाड्या सुरू केल्या आहेत. एक्स्प्रेस गाड्याही धावत आहेत. केवळ अमरावती पॅसेंजर बंद आहे. येत्या काळात तीसुद्धा सुरू करणार आहेत. रेल्वेकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर तातडीने ही गाडीही सुरू होऊन प्रवाशांचे होणारे हाल वाचणार आहेत.
राजकुमार कुरील
वाणिज्य प्रबंधक, नंदुरबार
कोरोना नियंत्रणात येत असल्याने आतातरी सर्व रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. अमरावती पॅसेंजर बंद असल्याने इतर गाड्यांमध्ये प्रवासी वाढत आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे.
-हरीलाल पटेल
रेल्वे प्रवासी
पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. यातून दुचाकी किंवा अन्य खासगी वाहनांनी प्रवास करणे शक्य होत नाही. त्यासाठी रेल्वे प्रवास परवडणार आहे.
-जितेंद्र सोनार
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
उधना फेस्टिव्हल
विशाखापट्टणम-गांधीधाम
हावडा-पोरबंदर
यशवंतपूर-अहमदाबाद