यावेळी कार्यकर्त्यांनी ‘आपल्या आठवणीतले डॉ. नरेंद्र दाभोळकर’ यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. डॉक्टरांच्या जुन्या आठवणी, डॉक्टरांचा सहवास, डॉक्टर कशा पद्धतीने आपल्याला भेटले, मग ते पुस्तक रूपाने असतील, डॉक्टरांचे अनेक व्हिडिओ असतील, डॉक्टर प्रत्यक्ष भेटले असतील असे अनुभव यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. त्यात विशेषत: डॉक्टरांची साधी राहणी, उत्तम वक्तृत्व शैली, कार्यकर्त्यांमध्ये राहणे, खाणे, झोपणे असे प्रसंग कार्यकर्त्यांनी सांगितले. एक मोठा माणूस, उत्तम वक्ता, उत्तम वक्तृत्व शैली, एक चांगले कबड्डीपटू त्याचबरोबर अनेक पुरस्कार प्राप्त असलेले डॉक्टर होते. आज जरी डॉक्टर आपल्यामध्ये नसतील, पण डॉक्टरांचे विचार आपल्यासोबत आहेत आणि त्या विचारांनी प्रेरित होऊन आपण आज एकसंधपणे शाखा म्हणून जिल्हा म्हणून आणि राज्यभर आपण काम करत असतो, असे अनुभव यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. सर्वच मान्यवरांनी डॉक्टरांचा सहवास मिळालेले अनुभव आणि डॉक्टरांच्या विचारांनी प्रेरित होऊन कामाची सुरुवात केली याबद्दल माहिती दिली. अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनीही डॉक्टरांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष हैदरअली नुरानी, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, शहादा शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. डी. पटेल, उपाध्यक्षा संगीता पाटील, डॉ. अलका कुलकर्णी, जायंट्स ग्रुपचे सदस्य माणक चौधरी, कैलास भावसार, ॲड. गोविंद पटेल, प्रवीणा कुलकर्णी, सुनीता पटेल, प्रवीण महिरे, धीरज शिरसाठ, विजय बोडरे, श्याम भलकारे, प्रदीप केदारे, अरिफ मन्यार, प्रवीण सावळे, भटू वाकडे, हृदयेश चव्हाण, डॉ. एच. एम. पाटील व इतर संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शहादा शाखेचे कार्याध्यक्ष संतोष महाजन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले. आभार प्रधान सचिव श्रीकांत बाविस्कर यांनी मानले.