शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

अस्तंबा येथील उत्सव यात्रा नव्हे दिवाळीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अस्तंबा येथे दिवाळीनिमित्त पारंपरिक पद्धतीने होणा:या पूजेला सातपुडय़ाती आदिवासी ‘डोगोअ दिवाली’ असे म्हणतात. येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अस्तंबा येथे दिवाळीनिमित्त पारंपरिक पद्धतीने होणा:या पूजेला सातपुडय़ाती आदिवासी ‘डोगोअ दिवाली’ असे म्हणतात. येथील पूजेनंतर त्या भागात गावदिवाळींना सुरुवात होते. त्यामुळे ही यात्रा नसून दिवाळीच असल्याचे तेथील काथाकार व काही जाणकारांमार्फत सांगितले जात आहे. सातपुडय़ातील अस्तंबा ता.धडगाव येथे दिवाळीनिमित्त पूजा करण्याची तेथील आदिवासींची पारंपरिक पद्धत आहे. खरीप हंगामातील नवीन अन्न याच वेळेस निघत असून या उत्पन्नातून भविष्यात अन्नाचा दुष्काळ जाणवू नये व मानवी जीवनासह पशुधनाच्या आरोग्यासाठी ही पूजा करण्यात येत आहे. या पूजेला सातपुडय़ातील आदिवासी ‘डोगोअ दिवाली’ असे म्हणत असून याच पूजेनंतर त्या भागातील गावदिवाळींना सुरुवात होते. परंतु दिवाळीनिमित्त होणा:या पूजांमध्ये अस्तंबा येथील सर्वाधिक मोठी पूजा असल्याने ¨ठकठिकाणाहून भाविकही येऊ लागले आहे. त्यामुळे आदिवासींच्या या दिवाळीला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याचे सातपुडय़ात पारंपरिक पद्धतीने मौखिक साहित्यीकार तथा कथाकार व काही जाणकारांनी म्हटले आहे. अस्तंब्याच्या दिवाळी पूजेसाठी प्रत्येक परिवारातील प्रमुख व्यक्ती जात असतो. ही व्यक्ती सोबत नवीन अन्नाचे कण व शेती नांगरतांना वापरले गेलेले दोर देखील नेत आहे. त्याशिवाय रोशा घटकातील विशिष्ट प्रकारच्या एका वनस्पतींची छोटी मोळीही नेण्याची प्रथा  आहे. अस्तंबा येथे पूजा करुन परतणारे भाविक हे गवताची मोळी पूजाविधी करीत दरवाजावर लावत असतात. या पूजेनंतर समाजात नवीन अन्नाच्या पूजेला सुरुवात होते.

धडगाव तालुक्यातील सर्वात उंच डोंगरावर ही पूजा होत असल्यामुळे तेथे जाणा:या प्रत्येक भाविकांना चारही मार्गाने गेले तरी डोंगराच्या पायथ्यापासून चढावेच लागते. तेथे जाणारे भाविक हे अश्वत्थमा ऋषींचा जयजयकार करीत डोंगरावर जातात. तिव्र चढा व सलग चढावे लागत असल्यामुळे बहुतांश भाविक हे दमून जातात. त्यामुळे सातपुडय़ातील आदिवासी  भाषेत ‘नाडो टाकीने खेची ले ’ अशी घोषणात्म भावनाही व्यक्त करण्यात येत असते. आदिवासी भाषेतील डोगोअ याचा अर्थ डोंगर असा होत असून या पूजेला डोंगरावरची दिवाळी असे म्हटले जात आहे. त्यामुळे तेथील कथाकार व काही जाणकारांमार्फत सांगण्यात येत   आहे.