लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रिपल तलाक चा पहिला गुन्हा शहादा पोलीस ठाण्यात नोंदला गेला आहे. चारित्र्याचा संशयावरून पतीने तीन वेळा तलाक बोलून कायद्याचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आसीफ आरीफ खाटीक, रा.80 फुटीरोड, धुळे असे संशयीताचे नाव आहे. शहादा येथील एकलव्य नगरमध्ये राहणा:या आफ्रिन आसीम खाटीक या महिलेचा पती आसीफ हा विवाह झाल्यापासून शहादा व धुळे येथे शाररिक व मानसिक त्रास देत होता. नेहमीच चारित्र्याचा संशय घेत होता. 11 सप्टेंबर रोजी आसीफ याने पत्नीला तीन वेळा तलाक शब्द उच्चारून तलाक दिला. याबाबत आफ्रीन यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने आसिफविरुद्ध छळवणूक आणि मुस्लीम वुमेन्स अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक गावीत करीत आहे.दरम्यान, केंद्र शासनाने मुस्लिम वुमेन्स अॅक्ट लागू केल्यानंतर अशा प्रकारचा पहिलाचा गुन्हा जिल्ह्यात दाखल झाला आहे.
ट्रिपल तलाकचा जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:55 IST