लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छता आणि आरोग्य हे एकमेकांशी संबंधीत आहे. यामुळे ग्रामस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीने सांडपाणी व घनकचरा संकलन व त्याचे व्यवस्थापन या विषयी नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, शाखा अभियंता, उप अभियंता, गट संसाधन केंदाचे कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे आयोजित करण्यात आला. उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा बोलत होते. ते म्हणाले, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बेसलाईन सव्र्हेक्षणात शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्या शौचालयांचा नियमित वापरा बरोबरच ग्रामीण भागातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हा महत्वाचा प्रश्न आहे. यामुळे ग्रामपंचायतीने आपला वार्षिक कृतीआराखडा तयार करतांना केवळ रस्ते, गटारी यांना महत्व न देता या आराखड्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयालाही प्राधान्य देण्यात यावे असे आवाहनही गौडा यांनी यावेळी केले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर ग्रामस्तरावर क्षमता बांधणी या उद्देशाने या तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी केले. प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा सोलापुर येथील समन्वयक सचिन ङिांजाडे हे उपस्थित आहेत. त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता पी.टी. बडगुजर, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सहा. गट विकास अधिकारी दिनेश वळवी, साधन व्यक्ती सचिन ङिांजाळे उपस्थित होते. सुत्र संचालन योगेश कोळपकर यांनी केले.
घनकचरा व्यवस्थापनात जिल्हा अग्रेसर राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:22 IST