यावेळी कोविड कक्षाचे प्रमुख डाॅ. राजेश वसावे, अधिसेविका नीलिमा वळवी, मजदूर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय साळुंखे, मनीषा गावीत आदी उपस्थित हाेते.
यावेळी बोलताना डाॅ. राजेश वसावे यांनी सांगितले की, स्वच्छता कर्मचारी हे शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयाचा आरसा असतात. सातत्याने हातात झाडू घेऊन स्वच्छतेला कर्तव्य म्हणून कार्य करतात. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता बाधित रुग्णांच्या सतत संपर्कात राहून धोका पत्करून काम करणारे सफाई कर्मचारी खऱ्याअर्थाने कोविड काळात कोरोना योद्धा म्हणून जगासमोर आले.
अधिसेविका नीलिमा वळवी यांनी, जिल्हा रुग्णालयाचा महत्त्वाचा कणा म्हणजे स्वच्छता कर्मचारी. कोरोना काळात कमी कर्मचाऱ्यांच्या बळावरदेखील विजय साळुंखे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सेवा देण्याचे कार्य केल्याचे सांगितले.
विजय साळुंखे यांनी सफाई कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. सातपुते यांनी दैनंदिन जीवनात सफाई कामगारांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रयोगशाळाप्रमुख सुभाष अहिरे यांनी केले. यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ढंडोरे, विक्रम कोळी, अमित चनाल, नागेश गव्हाणे, उमेश भगुरे, गजानन घुगे, राजेंद्र मोरे, किरण ठाकरे, कृष्णा ठाकरे, किसन वळवी, शैलेंद्र वल्गर, राजेश कोतवाल आदींनी परिश्रम घेतले.