शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

जिल्ह्याला पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर्स रुग्णसेवेत तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाबाधितांची प्रकृती चिंताजनक झाल्यास त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास प्रणाली अर्थात, व्हेंटिलेटर गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत, केंद्र ...

नंदुरबार : कोरोनाबाधितांची प्रकृती चिंताजनक झाल्यास त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास प्रणाली अर्थात, व्हेंटिलेटर गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत, केंद्र सरकारने देशभरात व्हेंटिलेटर्स वाटप केले होते. जिल्ह्याच्या खात्याही तब्बल ५८ व्हेंटिलेटर्स आले होते. गेल्या काळात या यंत्रांचा उपयोग झाला असून, तूर्तास यातील १० मात्र उपयोगाअभावी बंद आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी १० व्हेंटिलेटर्स उपलब्ध होते. सोबत १० हायफ्लो मशीनही होते. यामुळे गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार करणे शक्य होत होते, परंतु रुग्णसंख्या वाढल्यानंतर जिल्ह्यातून झालेल्या पाठपुराव्याने ४८ व्हेंटिलेटर हे सिव्हिलसाठी तर १० व्हेंटिलेटर हे धडगाव आणि नवापूर रुग्णालयात दिले गेले होते. देण्यात आलेले हे व्हेंटिलेटर्सचा वापर केवळ नंदुरबारात प्रारंभी झाला. नेत्रकक्षातील प्रत्येक बेडसाठी हे व्हेंटिलेटर्स लावले गेले. नवापूर गेल्या दोन महिन्यांपासून ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने हे व्हेंटिलेटर्स वापरात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे, परंतु धडगावात मात्र त्यांचा वापर झालेला नसल्याचे खात्रीशीरपणे सांगितले जात आहे. येत्या काळात त्यांचा उपयोग होणार असल्याने हे मशीन वाया जाणार नसल्याची माहिती दिली गेली आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात वापरात येणाऱ्या व्हेंटिलेटर्सची स्थिती चांगली असून, वेळोवेळी सर्वच व्हेंटिलेटर कामी आल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळातही हे मशिन्स कामी येणार असल्याने, त्यांची देखभाल दुरुस्ती आरोग्य अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी करून घेत आहेत. येत्या काळात जिल्ह्यासाठी ऑक्सिजन प्लांट वाढणार असल्याने, या मशिन्सचा वापर इतर ठिकाणी शक्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, सध्या नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.

नवापुरात तीनच सुरू

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या कक्षात पाच व्हेंटिलेटर्स देण्यात आले होते. तीनच सुरू असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित दोन मशिन्स पडून असल्याची माहिती आहे. नवापुरातील गंभीर रुग्णांना नंदुरबार येथे हलविले जात असल्याने, या व्हेंटिलेटर्सचा वापर हा कमीच असल्याची माहिती दिली गेली.

धडगावात मात्र बंद

धडगाव रुग्णालय आधीपासून समस्यांचे माहेरघर आहे. या ठिकाणी सध्या मशीन असले, तरी त्यासाठी लागणारा २४ तास वीजपुरवठा नसल्याने, कोणत्या रुग्णाला व्हेंटिलेटर्स लावणार, असा प्रश्न आहे. रुग्णालयात सध्या केवळ दैनंदिन तपासण्या करण्यावरच भर दिला जात आहे. कोरोनाबाधित थेट नंदुरबारकडे येत आहेत.

नंदुरबारात उपयोगी

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या सुमारे २० हजारांच्या जवळपास रुग्णांनी गेल्या दीड वर्षांत उपचार घेतले आहेत. बेड व ऑक्सिजन सुविधा असल्याने पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर्स भविष्यातही कामीच येणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले गेले. यात वाढ होणेही अपेक्षित आहे.

पीएम केअर फंडातून

पीएम केअर फंडातून मिळालेल्या ४८ मशिन्सला तातडीने जिल्हा रुग्णालयात इन्स्टाॅल करण्यात आले होते. यातून रुग्णांना अनेक तास व्हेंटिलेटर सहज मिळाल्याने, त्यांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील आधीचे मशिन्सही चांगल्या स्थितीत असल्याने त्यांचाही वापर होत आहे. सध्या रुग्णसंख्या घटल्याने यातील काही मशिन्स बंद करण्यात आले आहेत. गंभीर रुग्ण आल्यावर त्यांना या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून बरे करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, शहादा, तळोदा व अक्कलकुवा येथील शासकीय रुग्णालयांमध्ये ही वाढीव व्हेंटिलेटर दिले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.