सभेच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ सल्लागार अरुण साळी (तळोदा) होते. सभेला मावळते जिल्हाध्यक्ष कमलाकर मुरलीधर बागूल, राजेंद्र साळी, संस्थापक सल्लागार राजेंद्र निकुंभ यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा साळी समाजातर्फे नंदुरबार, धुळे व जळगाव खानदेशस्तरीय युवा संमेलन, उपवधू-वर मेळावा आयोजित करणे, समाजाच्या पारंपरिक चालीरीतीत एकसूत्रता आणणे व समाजोपयोगी अन्य उपक्रमांचे नियोजन करणे, समाज संघटन व एकजूट करण्यासंदर्भात सर्वानुमते ठराव मंजरू करण्यात आले. त्यानंतर समाजाच्या जिल्हास्तरीय नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी विश्वजित क्षीरसागर (शहादा), उपाध्यक्ष प्रकाश क्षीरसागर (शहादा), माधव साळी (अक्कलकुवा), प्रकाश साळी, सचिव विलास साळी, सदस्यपदी शामकांत साळी, प्रशांत बोरसे, राजाभाऊ साळी, उमेश साळी, नितीन साळी, अनिल क्षीरसागर, योगेश साळी, ऋषीकेश बागडे, सुशीलकुमार क्षीरसागर, गिरीश लांबोळे, राजेंद्र लांबोळे, सल्लागारपदी रमेश साळी, शरदचंद्र सोनवणे, सुरेश साळी, सुदाम साळी, रत्नकांत साळी, डॉ. शरद लांबोळे यांची निवड करण्यात आली. या सभेत अरुण साळी, राजेंद्र निकुंभ, सतीश साळी, विनोद साळी, रत्नकांत साळी, डॉ. शरद लांबोळे यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक उदय निकुंभ यांनी, तर सूत्रसंचालन प्रेममोहन सोनवणे यांनी केले.
साळी समाजाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST