शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नवापुरातील पोल्ट्रीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST

नवापूर : तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने परिणामकारक व योग्यरीतीने सर्वेक्षण करावे आणि पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांच्या ...

नवापूर : तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने परिणामकारक व योग्यरीतीने सर्वेक्षण करावे आणि पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांच्या संख्येची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

वन विभागाच्या मदतीने स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गांची माहिती घेण्यात यावी आणि वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, जलाशय, पाणथळ जागेत स्थलांतरित व जंगली पक्षी यांच्या वास्तव्याचा शोध घेण्यात यावा.

वन विभागाच्या साहाय्याने स्थलांतरित व वन्य पक्ष्यांचे नमुने घ्यावे, पक्षी विक्रेता केंद्र ठिकाणे व तेथील पक्ष्यांची संख्येबाबत माहिती घेण्यात यावी. बर्ड फ्लू प्रभावित राज्यातील शेजारच्या सीमावर्ती भागांची माहिती घेण्यात यावी.

व्यावसायिक व परिसरातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने तातडीने घ्यावे. पक्ष्यांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूमुळे बर्ड फ्लूचा संशय असल्यास तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा. तसेच बाधित पक्ष्यांची शास्त्रीय पद्धती विल्हेवाट करणे, पोल्ट्री फार्म व परिसरातील स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. नियंत्रित व प्रतिबंधित क्षेत्रातील विल्हेवाट लावलेले पक्षी, नष्ट केलेले अंडी यासह पशुखाद्याबाबत सर्व आकडेवारीची नोंद ठेवावी. व्यवसायिक व परिसरातील पोल्ट्री फार्मधारकांना जैव सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत योग्य मार्गदर्शन करावे.

आरोग्य विभागाने लसीकरण, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण व निगराणी क्षेत्रातील जलद कृती दलातील सदस्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय जलद कृती दल तयार करावे. विल्हेवाट ऑपरेशनमध्ये व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. विषाणू विरोधी औषधांचा वेळेवर व सातत्याने पुरवठा करावा.

जिल्हा परिषदेने बर्ड फ्लूबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करावी व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करावी. निगराणी क्षेत्राची आखणी करून त्यामधील येणाऱ्या क्षेत्रांची व गावांची माहिती घ्यावी. बाधित व निगराणी क्षेत्र तसेच खड्ड्यांची जागा दर्शविणारे तात्पुरते स्थायी स्वरूपाचे मोठे फलक तयार करून त्या क्षेत्राच्या ठिकाणी जनजागृतीसाठी दर्शनी भागात लावावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने बर्ड फ्लूवर नियंत्रण व प्रतिबंधासाठी जेसीबी, जेटींग कम सक्शन मशीन, फॉगर मशीन, फवारणी मशीन इत्यादी विविध साहित्यांची उपलब्धता सुनिश्चित करावी. बाधित झालेल्या क्षेत्रांचे नकाशे तयार करणेकामी मदत करावी. पोलिसांनी शेजारील राज्य आणि ठिकाणे येथून बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांची अनधिकृत वाहतूक व त्यांच्या संबंधित उत्पादने नंदूरबार जिल्ह्यात येणार नाहीत याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जनजागृती करण्याचेही निर्देश

वन विभागाने वन्य तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे असामान्य मृत्यूबाबत जिल्हा प्रशासनास वेळोवेळी माहिती द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तालुकास्तरावर सर्व संबंधिताच्या बैठका घ्याव्यात. बर्ड फ्लू नियंत्रणासाठी आवश्यक साधन सामग्रीची व्यवस्था करावी. बाधित क्षेत्र साथरोगापासून मुक्त होईपर्यंत कोणताही नवीन जिवंत पक्षी बाधित क्षेत्रात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. साथ रोगाबाबत जनजागृती करावी.