शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर सीमा तपासणी नाक्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राज्याच्या सीमेवरून आतापावेतो सुमारे २५ हजार स्थलांतरीतांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी सोय करून देण्यात आल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राज्याच्या सीमेवरून आतापावेतो सुमारे २५ हजार स्थलांतरीतांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी सोय करून देण्यात आल्याचे समाधान जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केले. सीमा तपासणी नाक्यावर दिलेल्या भेटीनंतर ते बोलत होते.नवापूर तालुक्यात सुरू असलेल्या मजगी, मनरेगा व इतर कामांची पाहणी, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध ठिकाणांची पाहणी करून येथील तहसील कार्यालयात विविध विभागांच्या आढावा बैठका जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड बुधवारी घेतल्या. उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांच्यासह पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी, प्रभारी तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिश्चंद्र कोकणी, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. चौधरी याप्रसंगी उपस्थित राहीलेत.विसरवाडी जवळ मोठे कडवान येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरूअसलेल्या गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहाणी त्यांनी केली. मजुरांशी संवाद साधतांना प्रति दिन किती मजुरी मिळते, किती दिवसांपासून काम सुरू आहे. पहिल्या मस्टर वरील मजुरीचे पैसे मिळाले का? याबाबत त्यांनी विचारणा केली. तेथे उपस्थित सहाय्यक अभियंता ठाकरे यांना किती काम झाले व पाण्याचा किती साठा होईल याची माहिती जाणून घेतली.तालुका कृषी विभागांतर्गत फळबाग लागवड, मजगी, शेतबांध बंदीस्ती इत्यादी कामाच्या सेल्फ तयार करून तत्काळ कामे सुरू करावीत अन्यथा प्रशासकीय कार्यवाहीस सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा जिल्हाधिकारी भारूड यांनी दिला. वहार्डीपाडा येथील जुन्या सिंमेट बंधाºयातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शैलेश गावीत, वहार्डीपाडा सरपंच लिलाबाई वसावे, माजी पंचायत समिती सदस्य राम कोकणी, विस्तार अधिकारी दिलीप कुवर आदी उपस्थित होते.नवापूर तालुक्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे सर्व कामे अंत्यत चांगल्या पध्दतीने सुरू असल्याबद्दल गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांचे त्यांनी कौतुक केले. नवापूर सिमा तपासणी नाक्यावर लॉकडाऊन मधील शिथिलता पाहता गुजरात राज्यातुन महाराष्ट्र सिमेवर असंख्य मजूर व कामगार येत आहेत. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून त्यांना एसटी बसने इच्छीत ठिकाणी पोहचविण्यात येत असल्याने तेथे भेट देवून त्यांनी पाहणी केली. आपल्या राज्य सीमेवर एक ही नागरीक शिल्लक रहायला नको किंवा पायी जायला नको याची दक्षता घ्यावी. आवश्यक झाल्यास वाढीव बसेस मागवा अशी सूचना त्यांनी आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना केली.४सीमा परिवहन तपासणी नाक्यावर सार्वजनिक स्वच्छता गृह बंद ठेवण्यात आल्याची बाब समोर आल्यावर संबंधीतांशी याबाबत बोलणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी स्पष्ट केले.४कोरोनाशी चार हात करून त्याचा नवापूर तालुक्यात शिरकाव न होऊ देण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारे सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी तोंड भरून कौतुक केले व समाधानही व्यक्त केले.