ऑक्सीजन निर्मिती व डायलिसीस युनिटमध्ये जिल्हा झाला स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:10 PM2020-11-10T12:10:42+5:302020-11-10T12:10:51+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसीससाठी जिल्हाबाहेर जाण्याची गरज राहणार नाही. जिल्हा रुग्णालयात आता १२ डायलिसीस युनिट ...

The district became self-sufficient in oxygen production and dialysis units | ऑक्सीजन निर्मिती व डायलिसीस युनिटमध्ये जिल्हा झाला स्वयंपूर्ण

ऑक्सीजन निर्मिती व डायलिसीस युनिटमध्ये जिल्हा झाला स्वयंपूर्ण

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसीससाठी जिल्हाबाहेर जाण्याची गरज राहणार नाही. जिल्हा रुग्णालयात आता १२ डायलिसीस युनिट कार्यान्वीत झाले आहेत. याशिवाय ऑक्सीजन मध्येही जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे. येथेच ऑक्सीजन निर्मिती केली जात आहे. रुग्ण व नातेवाईकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी जम्बो आरओ प्रकल्प देखील बसविण्यात आला आहे. या सर्व उपक्रमांचा शुभारंभ पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. 
 जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील नवे डायलिसीस यंत्र, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प  आणि नेत्ररुग्ण कक्ष व नेत्रशस्त्रक्रियागृहचे  उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. 
या सर्व सुविधांसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या सर्व सुविधा उपयुक्त ठरतील आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना चांगले उपचार मिळतील असा विश्वास यावेळी पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी व्यक्त केला.
जिल्हा रुग्णालयात नवे पाच डायलिसीस  यंत्र आणि दोन हजार लिटर क्षमतेचा आर.ओ. प्लॅन्ट बसविण्यात आला असून त्यास ७७.५ लाख रुपये खर्च झाला आहे. डायलिसीस यंत्रामुळे नागरिकांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही.
कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची पूर्तता नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टमधून होणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी एक कोटी १९ लाख रुपये खर्च झाला असून दररोज १२५ जम्बो सिलींडर ऑक्सिजन पुरविण्याची प्रकल्पाची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे कोरोनावरील उपचारासाठी आणि इतरही प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा स्थानिक पातळीवर करणे शक्य होणार आहे.
रुग्णालयात २० खाटांचा  नवा नेत्ररुग्ण कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच नेत्रशस्त्रक्रीयागृहदेखील तयार करण्यात आले आहे. त्यासाठी दीड कोटी खर्च करण्यात आला आहे. नेत्र रुग्णांवर आधुनिक उपचार  आणि शस्त्रक्रीया करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.  या सुविधांमुळे सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होणार असून त्यांचे हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्ट सुरू...
 जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्वाहनच्या अर्थात लिफ्ट सुविधेचे उद्घाटनही  पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुविधेचा चांगला उपयोग होणार आहे. उद्वाहनसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ४८ लक्ष  निधी खर्च करण्यात आला आहे. हे कॅप्सूल प्रकारचे असून सर्व आधुनिक सोईंनीयुक्त आहे. 
 दीड कोटी रुपये खर्च करून नेत्र कक्ष देखील कार्यान्वीत करण्यात आला आहे. या ठिकाणी २० बेड राहणार आहे. स्वतंत्र नेत्र रुग्णालयात सद्या कोरोना उपचार कक्ष सुरू करण्यात आला आहे. तो कक्ष बंद झाल्यावर हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. 

Web Title: The district became self-sufficient in oxygen production and dialysis units

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.