शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा शासकीय कागदाचा खर्च आला लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:40 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लाल कापडात बांधलेल्या फाईली, टेबलांवरच्या असंख्य फाईली, जीर्ण व जुनाट कागद असे चित्र वर्षानुवर्षे शासकीय कार्यालयात दिसून येत होत़े या चित्राला कलाटणी देण्याचा प्रयत्न सध्या नंदुरबार जिल्हा प्रशासन करत आह़े यामुळे गेल्या वर्षात केवळ लाख रूपयांचा कागद वापरून प्रशासनाने खर्च कपात केली ...

ठळक मुद्देदोन वर्षात 40 टक्के केला खर्च कमी
भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लाल कापडात बांधलेल्या फाईली, टेबलांवरच्या असंख्य फाईली, जीर्ण व जुनाट कागद असे चित्र वर्षानुवर्षे शासकीय कार्यालयात दिसून येत होत़े या चित्राला कलाटणी देण्याचा प्रयत्न सध्या नंदुरबार जिल्हा प्रशासन करत आह़े यामुळे गेल्या वर्षात केवळ लाख रूपयांचा कागद वापरून प्रशासनाने खर्च कपात केली आह़े तब्बल 22 विभाग असलेल्या नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेला वर्षाला एक लाख रूपयांचा कागद गेल्या दोन वर्षापूर्वी लागत होता़ शासकीय दरांनुसार हा कागद खरेदी होत असला, तरीही ङोरॉक्स काढण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे वर्षाकाठी किमान 200 च्या वर रिम कामकाजासाठी लागत होत़े एका रिममध्ये 500 कागदांचा पुरवठा करण्यात येत असतानाही कागदांची गरज पूर्ण होत नव्हती़ यात गेल्या दोन वर्षापासूून संगणकीकृत कामकाजाला सुरूवात झाल्याने आणि ई-ऑफिसचा वापर वाढवला गेल्याने कागदाचा हा खर्च आटोक्यात येण्यास सुरूवात झाली आह़े एकाच कागदाच्या वेळोवळी प्रती काढून त्या वाटप करण्यापेक्षा एकदा स्कॅन करून सर्व 22 विभागांमध्ये संबधित फाईली पोहोचवल्या जात असल्याने कागद खर्च ब:यापैकी कमी झाला आह़े जिल्हा प्रशासनाकडून ई-ऑफिस सोबतच ऑनलाईन डॉक्यूमेंट स्कॅनिंग केले जात असल्याने रेकॉर्ड विभागात दिसून येणारे ‘फायलींग’चे जाळे ब:यापैकी कमी झाले आह़े येत्या काळात हा खर्च आणखी कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्न करून असून ई-गव्हर्नन्सच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आह़े जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रांताधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांमध्ये कागदाचा खर्च मर्यादित कसा होईल, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत़ जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्रपणे खरेदी करणारे सरदार सरोवर प्रकल्प विभाग, रोजगार हमी योजना विभाग, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, आरोग्य विभाग यांच्याकडून कागदाचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आह़े या प्रत्येक विभागात वर्षाला किमान 70 हजार पाने ङोरॉॅक्स आणि त्यासाठी लागणारे 160 रिम तसेच प्रिंटींग डॉक्युमेंटसाठी 50 रिम अधिक खरेदी करावे लागत होत़े मात्र कागदाचा हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनीही ई-गव्र्हनन्सचा पर्याय निवडला आह़े येत्या वर्षात या विभागांकडूनही ई-ऑफिस प्रणालीचा स्विकार करण्यात येणार असल्याने कागद खरेदीत काहीअंशी घट येऊन पेपरलेस वर्कला प्राधान्य देण्यात येणार आह़े