शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोठली खुर्द येथे रेशन व भाजीपाला वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द गावातील लाभार्थ्यांना रेशन व भाजीपालाचे वाटप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द गावातील लाभार्थ्यांना रेशन व भाजीपालाचे वाटप जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि प्रांतधिकारी वसुमना पंत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले़ यावेळी लाभार्थींना कोरोना संदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली़प्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ जे़आऱतडवी, पंचायत समिती सदस्य दिनेश वळवी, ग्रामपंचायत सदस्य विलास शेगजी वळवी, बालाजी संजय वळवी, पोलिस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील ग्रामसेवक आऱडी़पवार,पोलीस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील, चंद्रकांत अनिल वळवी, लक्ष्मण नरभवर, कृष्णा वसावे, शांतीलाल मगन पाटील, डॉ़ धीरूभाई पाटील, अशोक प्रेमसिंग नाईक, अतुल गावीत यांच्यासह नागरिक उपस्थित होते़ कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ नुसार संचारबंदी संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ ह्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने प्रशासनाकडून ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू गहू, साखर, डाळ-तांदूळ रेशनचे साहित्य आणि भाजीपाला या सर्व गोष्टींचे वाटप कोठली खुर्द ग्रामपंचायती घेण्यात आला़ गावातील १ हजार १०० लाभार्थींना ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ, २ रुपये किलो प्रमाणे गहू, २० रुपये दराने साखर यासह कोठली गावातील दात्यांकडून भाजीपाला टमाटे, कारले, मका या भाजीपाल्याचे वितरण करण्यात आले़गावात सुमारे २ क्विंटल भाजीपाला आणि १ हजार १०० लाभार्थींना ८० क्विंटल तांदूळ, ५५ किलो गहू आणि दीड क्विंटल साखरेचे वाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिक वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याहस्ते करण्यात आले़ कार्यक्रमात सहभागी ग्रामस्थांना एक मीटर अंतराची रेषा आखून देण्यात आली होती़ त्यानुसार गर्दी न करता वितरण करण्यात आले़दरम्यान गुजर समाज आणि व्हीजेएमटीतर्फे संपुर्ण नंदूरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात माहिती देणारा जनजागृती रथ फिरवण्यात येत आहे़ या रथाची माहिती यावेळी देण्यात आले़ मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले की, अंगणवाडींतर्गत लाभार्थींना अमृत आहार योजनेंतर्गत घरपोच पोषण आहार पोहोचवला जाणार आहे़ कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य, विभाग, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना शासनाकडून ५० लाख रुपयांच विशेष विमासुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे़ यामुळे त्यांना आधार मिळाला आहे़