गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या जलनेती अभियानाचा नवापूरमध्ये समारोप करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष हेमलता पाटील यांची विशेष उपस्थिती होती. बुरशीजन्य आजारासाठी तसेच मायग्रेनसारख्या महाभयानक आजारावर मात करण्यासाठी जलनेती उत्तम पर्याय असल्याचे नगराध्यक्ष हेमलता पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी योगशिक्षक डॉ. नितीनकुमार माळी, नीलिमा माळी तसेच कुशलकुमार माळी यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून साधकांना जलनेतीबाबत माहिती दिली. सार्वजनिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश पाटील, उर्दू शाळेचे पर्यवेक्षक शाकीर शेख जाहीर पठाण यांनी उपस्थिती दिली. यावेळी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना जलनेतीचे पात्र मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटण्यात आले. यासाठी योगिता पाटील, माधुरी चित्ते, करूणा पाटील, हेमलता पाटील, मनीषा भदाणे, मीना तांबोळी यांनी परिश्रम घेतले. फर्जाना बानु, फिरदोस सय्यद, सलमा शेख, पिंजारी जकारिया यांनी परिश्रम घेतले. यासाठी आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंतजी बिरादार तसेच उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष परमपूज्य शिवानंद महाराज, अहमदनगरचे प्रेरणा नाबारिया यांचे मार्गदर्शन लाभले.
जोशाबा सरकार युवा मंडळामार्फत नवापूर येथील साधकांना मोफत जलनेती पात्राचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST