लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : लॉकडाऊनमुळे भटक्या-विमुक्त समाजातील कुटुंबांवर मोठा परिणाम जाणवत आहे. खांडबारा, बर्डीपाडा येथील ५३ कुटुंबांना मदत म्हणून विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नंदुरबारच्यावतीने नाथजोगी व नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या निराधार व्यक्तींना कोरडा शिधा वाटप करण्यात आला.खांडबारा जि.प. मराठी शाळेजवळील १३ व बर्डीपाडा येथील ४० कुटुंबांना गहू, तांदूळ, तूरदाळ वाटप करण्यात आले. या वेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, सरपंच शैलेश वळवी, पद्माकर शिंदे, ग्रा.पं. सदस्य वैजनाथ वळवी, अनिल शर्मा, विश्वनाथ पटेल, सुनील नाथजोगी, मनीष पटेल, राकेश पटेल, प्रफुल पटेल, पंकज पटेल, रामकृष्ण पटेल, ललीत पटेल, रामेश्वर पाटील यांच्या हस्ते कोरड्या शिधाचे वाटप करण्यात आले. कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत सूचना देण्यात आल्या. विश्व हिंदू परिषदेचे धोंडीराम शिनगर, आर.एस. माळी, अजय कासार, बजरंग दलचे अॅड.रोहन गिरासे, विवेक चौधरी, दुर्गेश चौधरी, किशोर तांबोळी, इंद्रसिंग गिरासे, महेंद्र सोनी, देवेंद्र कासार, पुरुषोत्तम काळे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.विसरवाडी : खांडबारा येथे भिक्षा मागून जगणाऱ्या कुटुंबांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली. याबाबत विसरवाडी येथील एका व्हाट्सअप ग्रुपवर या गरीब कुटुंबांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले. त्यांची व्यथा पाहून विसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता जयेश अग्रवाल यांनी खांडबारा येथील श्रीराम किराणाचे संचालक जयू अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून या १२ भिक्षेकरु कुटुंबांना गहू (पिठाची थैली), तांदूळ, तेल, साखर, डाळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
खांडबारा येथे ५३ कुटुंबांना मदत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:24 IST