नंदुरबार : सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत नंदुरबार व तळोदा प्रकल्पांतील लाभार्थी विद्याथ्र्याना एकूण 17 कोटी 17 लाख 83 हजार रुपयांचा निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आह़े याबाबत संबंधित सर्व मु्ख्यध्यापकांकडून उपयोगिता प्रमाणपत्रही जमा करण्यात आले आह़े ‘सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती’ योजनेंतर्गत ेअनूसुचित जमातीमधील लाभार्थी विद्याथ्र्याना निधी देण्यात येत असतो़ 2017-2018 या शैक्षणिक वर्षात नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यांचा समावेश असलेल्या नंदुरबार प्रकल्पातील 78 हजार 229 विद्याथ्र्याना 9 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आह़े तर तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांचा समावेश असलेल्या तळोदा प्रकल्पातील 61 हजार 534 विद्याथ्र्यासाठी 7 कोटी 97 लाख 8 हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आह़े पहिली ते चौथीर्पयतच्या विद्याथ्र्याना 1 हजार, पाचवी ते सातवीर्पयतच्या विद्याथ्र्याना 1 हजार 500 तर आठवी ते दहावीच्या विद्याथ्र्याना 2 हजार रुपयांर्पयतच्या निधीचे वाटप करण्यात येत असत़े सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निधीची दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येत असत़े तसेच मार्च-एप्रिल महिन्यात शिष्यवृत्ती योजनेच्या निधीची मागणी करण्यात येत असत़े स्थानिक पातळीवर मुख्यध्यापकांकडून आपआपल्या शाळेतील विद्याथ्र्याची संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे निधीची मागणी करण्यात येत असत़े अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका तसेच महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी लाभार्थी विद्याथ्र्याना सुवर्ण महोत्सवी योजनेचा लाभ मिळत असतो़ या निधीची तरतुद जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येत असत़े पंचायत समितीस्तरावर गटशिक्षण अधिका:यांकडून मुख्यध्यापक आवश्यक निधीची मागणी करीत असतात़ तसेच गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभाग आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिका:यांकडे निधीची मागणी करीत असतात़ निधीला मान्यता मिळाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात ‘आरटीजीएस’ पध्दतीने निधी वर्ग करीत असतात़ यानंतर मुख्यध्यापकांकडून शिक्षण विभागाला उपयोगिता प्रमाणपत्र देण्यात येत असतात़ दरवर्षी दिवाळीच्या आधी या शिष्यवृत्तीचे विद्याथ्र्याना वाटप होणे आवश्यक असत़े मार्च-एप्रिल महिन्यात मुख्याध्यापकांकडून विद्याथ्र्याची संख्या लक्षात घेऊन गटशिक्षणाधिका:यांकडे तसा अहवाल सादर करण्यात येत असतो़ तसेच यंदा किती निधी लागणार आहे, याची माहिती देण्यात येत असत़े साधारणत जुन महिन्यार्पयत निधी उपलब्ध झाल्यावर दिवाळीर्पयत मुख्यध्यापकांनी निधी विद्याथ्र्याच्या बँक खात्यात वितरीत करणे महत्वाचे असत़े यंदा 2017-2018 च्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा निधीचे 100 टक्के वितरण झाले असून 2018-2019 च्या निधीसाठी माहिती संकलनाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़
सुवर्ण महोत्सवींतर्गत नंदुरबारात 17 कोटींचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:48 IST