शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

उनपदेव पर्यटनस्थळाकडे दुर्लक्षामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 22:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा पर्वत रांगेत, दरा धरणाशेजारी निसर्गरम्य वातावरणातील व पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेले निसर्गनिर्मित ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा पर्वत रांगेत, दरा धरणाशेजारी निसर्गरम्य वातावरणातील व पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेले निसर्गनिर्मित गरम पाण्याचा झरा म्हणून प्रसिद्ध असलेले उनपदेव ता.शहादा या धार्मिक व पर्यटनस्थळाची दुरवस्था झाली असून पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिकांसह पर्यटकांनी व्यक्त केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून औषधी गुणधर्म असलेल्या व नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असलेल्या उनपदेव, ता.शहादा या पर्यटनस्थळाची दुरवस्था झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे . श्रावण महिन्यात अनेक भाविक येथे येतात. धार्मिक उपक्रम राबवितात तर येथील गरम पाण्यात गंधकाचा समावेश असल्याने व हे पाणी नैसर्गिकरितीने भूगर्भातून गरम स्वरूपात येत असल्याने या पाण्यामुळे अनेक दुुुर्धर चर्मरोग बरे झाले असल्याने सर्वांचेच आकर्षण असलेल्या या पर्यटनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने येथे येणाºया महिला भाविक व पर्यटकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.२००६ व २०१७ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकी नदीला महापूर आला. या महापुरात उनपदेव संपूर्ण उद्ध्वस्त झाले. पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या येथील मूलभूत सुविधा नेस्तानाबूत झाल्या. गरम पाण्यावरील गोमुख, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी कपडे बदलण्यासाठी असलेले प्रसाधन गृह, नदी ओलांडून जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेले साकव, रस्ते व विविध विकास कामे उद्ध्वस्त झाली होती. अगदी गरम पाण्याचा झरासुध्दा नष्ट झाला होता. महापुराच्या काही कालावधीनंतर स्थानिक ग्रामस्थ व हौशी पर्यटकांनी या भागात भेट देवून परिस्थितीची पाहणी केली व गरम पाण्याचा झरा शोधला. स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने तात्पुती उपाययोजना करुन गरम पाण्याचा प्रवाह जीवंत ठेवण्यात यश मिळविले होते.मात्र यानंतर जिल्हा परिषद, वनविभाग व स्थानिक प्रशासनाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी येथे येणाºया पर्यटकांना कुठलीही मुलभूत सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवली आहे. मध्यंतरीच्या काळात राणीपूर, ता.शहादा वनविभागामार्फत येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या अर्धाकृती पुतळ्यासह विविध वनौषधींची बाग निर्माण करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी पॅगोडाची निर्मिती करण्यात आली तर बालकांसाठी बागेतच विविध खेळणी ठेवण्यात आली होती त्याचीही आता दुरवस्था झाली आहे. संरक्षणासाठी करण्यात आलेले सिमेंटच्या खांबाचे तारेचे कुंपणही तुटून गेले आहेत. तर वनविभागाने निर्माण केलेला दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता हा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशा अवस्थेत आहे. तीव्र चढ-उतार असल्याने या रस्त्यावरुन मार्गक्रमण करताना पर्यटक व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या सर्व सुविधांचीही पुनर्निमिती करणे आवश्यक आहे.पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्यासह जिल्हा परिषद प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या धार्मिक, निसर्गरम्य व आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या पर्यटनस्थळाकडे विशेष बाब म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटन खात्यामार्फत येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीसाठी व्यवस्था, प्रसाधन गृह, विश्रांती कक्ष, रस्ता, उद्यानाची निर्मिती व नदी ओलांडून जाण्यासाठी नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे .