शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नेटवर्क गायब होत असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणास अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

सध्याचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातल्यावर शिक्षण विभागाने मुलांना प्रत्यक्षात शाळेत ...

सध्याचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातल्यावर शिक्षण विभागाने मुलांना प्रत्यक्षात शाळेत जाता येत नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. कोरोना महामारीत सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. पालकांनीही कुवतीप्रमाणे आपल्या मुलांना स्मार्ट मोबाईल घेऊन दिला. मात्र कुकावल व कोठली येथे ऑनलाइन शिक्षणाची पाणी असून, तहानल्यासारखी होऊन गेली आहे. कारण शहादा तालुक्यातील कुकावल आणि कोठली ही दोन्ही गावे जवळ असून दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीकाठी खासगी कंपनीचे टॉवर असून, अधूनमधून नेटवर्क गायब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणास अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा नेटवर्क गायब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनसाठी ॲपवर जॉईन होताना खूपच उशीर लागतो आणि विद्यार्थी जॉईन झालेच तर शिक्षक काय शिकवित आहे हे रेंजअभावी तुटक आवाज येत असल्याने विद्यार्थ्यांना समजत नाही. दोन्ही गावांमध्ये नेटवर्कची समस्या येत असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

केंद्र सरकारने डिजिटल इंडियाच्या धर्तीवर अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. शिवाय आता कोरोना महामारीमुळे अनेक कामे प्रत्यक्षात ऑफिसात जाऊन न करता मोबाइलद्वारे वीज बिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे, रिचार्ज मारणे यासारख्या अनेक गोष्टी घरबसल्या होत असतात. मात्र, येथील मोबाइल टॉवरचे नेटवर्क मधूनच गायब होत असल्यामुळे कुकावल व कोठलीवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही गावांमधील अनेक विद्यार्थी शहादा, दोंडाईचा, वडाळी, बामखेडा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळा चालू होऊन दीड महिने उलटल्यावर आता पहिली घटक चाचणी सुरू होण्याची वेळ येऊन गेली आहे, तरी अजून शाळा चालू होण्याची कोणतीच लक्षणे दिसत नसल्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणावरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र कुकावल आणि कोठली येथील विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

उधार उसनवारीने पैसे गोळा करून आम्ही आमच्या मुलांना स्मार्ट मोबाइल घेऊन दिला आहे. मात्र आमच्या गावाजवळ टॉवर असूनदेखील नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. दोन दिवसांवर मुलांची पहिली घटक चाचणी सुरू होणार असून पुन्हा-पुन्हा नेटवर्कची समस्या उद्भवल्यास पेपर सोडवता येईल का? असे प्रश्न मुलांकडून विचारले जात आहे. - लक्ष्मण पाटील, पालक, कोठली, ता.शहादा