शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
3
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
5
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
6
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
9
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
10
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
11
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
12
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
13
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
14
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
15
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
16
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
17
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
18
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
19
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
20
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान

झोपडपट्टींचे अतिक्रमण नियमानुकूलवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येऊन गरिबांना न्याय द्यावा अशी मागणी पालिका सभेत करण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येऊन गरिबांना न्याय द्यावा अशी मागणी पालिका सभेत करण्यात आली. आयत्यावेळी आलेल्या विषयाला महत्त्व नसते. त्यामुळे सभा तहकूब करून पुन्हा तीन दिवसांनी सभा घेऊन अजेंड्यावर विषय आणावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी पालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अजेंडावरील १३ विषयांवर चर्चा करण्यात येऊन ते बहुमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर आयत्यावेळी भाजपचे नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी अतिक्रमित झोपडपट्टी नियमानुकूल करण्याच्या मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्न केला.मागील सभेत शहराचा मंजूर विकास आराखड्यातील शासकीय-निमशासकीय जमिनींवर आरक्षण असलेल्या जागेवर दाट लोकवस्तीचे घरे झालेली आहेत. अशा आरक्षीत जमिनीची पडताळणी करून आरक्षण मुक्त रहिवास विभागात समाविष्ट करण्याचा ठराव करण्यात आला. ठरावावर कारवाईसाठी पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.ठरावाला अनेक महिने लोटल्यानंतर देखील अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचा सर्व्हे करण्यात आला नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते नगरसेवक चारुदत्त कळकर यांनी सर्व्हे करणाºया एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी केली.सभेत सर्वसाधारण सभेत पालिका क्षेत्रातील माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करातून सूट देण्याच्या महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत कृती आराखड्यातून विकास कामे करण्यासाठी निधी मागणीच्या प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे. प्रभाग क्रमांक १८ व नवनाथ नगर भागातील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाच्या ना-हरकत दाखला देण्यासाठी कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधीच्या मागणीसाठी जिल्हाधिकाºयांना प्रस्ताव पाठविणे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत विविध कामे करण्यास मुदतवाढ देणे. स्वरूप नगरात १२ लाख ३० हजार ४४० रुपयांच्या पाईपलाईन टाकण्याच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.सफाई कामगार हिरालाल चौधरी व श्रीमती प्रमिला हडारे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर रवींद्र चौधरी व राजेंद्र हडारे यांना वारसाहक्काने सेवेत सामावून घेणे कामी आलेल्या अर्जावर निर्णय घेण्याच्या ठराव मंजूर करण्यात आला. सभेत विविध विषय समित्यांचे सभापती नगरसेवक उपस्थित होते.

झोपडपट्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मुद्यावर नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर अभियंता बोराडे यांनी उत्तर दिले. शहरात २४ झोपडपट्ट्या आहेत. अतिक्रमण नियमानुसार करण्यासाठी पाच सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यात जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांच्या समावेश आहे. अतिक्रमीत झोपडपट्ट्यांच्या सर्व्हे करून त्याच्या अहवाल समितीपुढे ठेवल्यानंतर कोणत्या झोपडपट्टीचे अतिक्रमण नियमानुकूल करायचे हे समिती ठरवेल. एमआयडीपीच्या कलम ३७ प्रमाणे कारवाई करून नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून हरकती मागवण्यात येतील. आलेल्या हरकतींची सुनावणी होऊन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील अशी माहिती अभियंता बोराडे यांनी दिली.