ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूर शिवारातील ब्राह्मणपुरी-गोदीपूर रस्त्यावर बिबट्या असल्याची अफवा पसरल्याने धावाधाव सुरू झाली होती. राणीपूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शेताची पाहणी केल्यावर रानमांजर असल्याचे आढळून आले.याबाबत वृत्त असे की, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी-गोदीपूर रस्त्यावरील अरुण दत्तात्रय पाटील यांनी आपल्या शेतात डाळींबाची लागवड केली आहे. येथे असलेले रखवालदार यांना आवाज आल्याने त्यांनी पाहणी केली असता एका कोपºयात पट्टेदार बिबट्या असल्याचे समजले. त्यांनी बाहेर धावाधाव करत गोदीपूर येथील ग्रामस्थांना बिबट्या असल्याचे सांगितले. ग्रामस्थांना लाठ्या-काठ्या, कोयता घेऊन शेतात पाचारण केले. गोदीपूर येथील पोलीस पाटील प्रवीण पाडवी यांनी तात्काळ राणीपूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी येऊन शेतात शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान त्यांना रानमांजर दिसून आले. भयभीत नागरिकांनी रानमांजरीला तेथून हाकलून लावले. या भागात बिबट्याचा संचार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे राणीपूर वनविभागाचे वनरक्षक अमर पावरा यांनी सांगितले. तसेच असे काही दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले. या वेळी वनविभागाचे वनमजूर सुकलाल पावरा उपस्थित होते.हिंस्त्र प्राण्यांचा संचार वाढलागोदीपूर परिसरात गेल्या महिनाभरापासून हिंस्त्र प्राण्यांचा संचार वाढला आहे. सातपुड्याच्या दºया-खोºयात पाण्याची कमतरता भासत असल्याने पाण्याच्या शोधात हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याच्या अफवेमुळे शेतीकामांवरही परिणाम होत आहे.
चर्चा बिबट्याची निघाले रानमांजर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:05 IST