सभेत संजय गांधी निराधार योजनेचे २२६, श्रावणबाळ योजना ३०९, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना १६९, इंदिरा गांधी विधवा योजना ९६ अशा ८०० प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. यात संजय गांधी योजनेची १४३ प्रकरणे अंतिम करण्यात आली आहेत. तसेच श्रावणबाळ योजनेचे २१८, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना ९३, इंदिरा गांधी विधवा योजनेचे ४९ अशी ५०३ प्रकरणे अंतिम झाली आहेत. एकूण १०८ प्रकरणे ही अपात्र, तर १८९ प्रस्तावांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील विधवा परित्यक्त्या महिलांना सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी समितीकडून प्रयत्न सुरू असून, तालुक्यातील पात्र लाभार्थी महिलांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन अध्यक्ष देवमन पवार यांनी केले आहे.
नंदुरबार तालुका, तसेच शहरातील पात्र लाभार्थींच्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.