शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पळाशी येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:15 IST

सीसीआयचा कापूस खरेदी बंदचा निर्णय

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयकडून खाजगी तेल व ढेप व्यापा:यांनी सरकी खरेदीस नकार दिल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आह़े यानुसार मंगळवारपासून जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आल़े विशेष म्हणजे हमीभाव जाहिर न करता व्यावसायिक दरांनुसार सीसीआयकडून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू होती़   नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी ता़ नंदुरबार येथील कापूस खरेदी केंद्रावर 26 ऑक्टोबरपासून सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली होती़ प्रारंभी चार हजार 611 रूपये दर सीसीआयने जाहिर करून शेतक:यांना आकर्षित करून घेतले होत़े मात्र प्रत्यक्षात तसे कोणत्याही प्रकारचे दर न देता, चार हजार 300 पेक्षा कमी दर क्विंटलमागे देण्यात आले आहेत़ दर कमी असूनही प्रतिसाद मिळत असतानाच मंगळवारी सकाळपासून खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने, कापूस विक्रीसाठी आलेली 100 वाहने परत गेली़ यातील काहींनी जिनिंग मिलमध्ये कापूस  नेला, मात्र तेथे केवळ 4500 रूपये दर मिळाल्याने छोटय़ा शेतक:यांनी नाईलाजास्तव कापूस विक्री केली आह़े  कापसाचे हेक्टरी उत्पादन यंदा वाढले नंदुरबार जिल्ह्यात यंदा एक लाख 18 हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती़ या कापसाचे उत्पादन हेक्टरी एक हजार किलो येण्याची चिन्हे असल्याने शेतकरी समाधानी होत़े नंदुरबार बाजार समितीने परवाना दिलेल्या खरेदी केंद्रांवर गत आठवडय़ात कापूस खरेदी सुरू झाली होती़ चांगल्या आणि उच्च दर्जाचा कोरडा कापूस प्रारंभी चार हजार 600 रूपये क्विंटल दराने खरेदी करण्यात आला होता़ परंतू दुस:या दिवसापासून दरांमध्ये 300 रूपयांची घट झाली़ याचवेळी सीसीआयने केंद्र सुरू केले होत़े मात्र सोमवारपासून सीसीआयची सरकी खरेदी करण्यास देशपातळीवरील व्यापा:यांनी नकार दिल्याने पेच निर्माण झाला़ हा पेच सोडवण्याऐवजी सीसीआयने नंदुरबारसह राज्याच्या विविध भागात सुरू असलेले कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत़ खाजगी जिनिंग उद्योगचालकांनी मंगळवारी कापूस खरेदी केला असला तरी दरांमध्ये घसरण कायम होती़ जिनिंग व्यापा:यांकडूनही तेल आणि ढेप उत्पादकांनी 1700 रूपये प्रतिक्विंटल सरकी खरेदी करण्यास प्रारंभ केल्याने येत्या काळात खाजगी जिनिंगमध्ये कापसाच्या दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता असल्याची माहिती जिनिंगचालक द्वारका अग्रवाल यांनी व्यक्त केल़े