मदत लांबल्याने पुरग्रस्तांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:16 PM2019-11-21T12:16:18+5:302019-11-21T12:16:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अतिवृष्टीला तब्बल तीन महिने उलटूनही पूरग्रस्तांना शासकीय अनुदान मिळाले नसल्याने सोरापाडा ता.अक्कलकुवा येथील पूरग्रस्तांमध्ये ...

Disappointment among the sufferers after seeking help | मदत लांबल्याने पुरग्रस्तांमध्ये नाराजी

मदत लांबल्याने पुरग्रस्तांमध्ये नाराजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अतिवृष्टीला तब्बल तीन महिने उलटूनही पूरग्रस्तांना शासकीय अनुदान मिळाले नसल्याने सोरापाडा ता.अक्कलकुवा येथील पूरग्रस्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
अक्कलकुवा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिवित व वित्तहानी  झाली होती. त्यात अनेक जनावरे दगावली, काही पुरग्रस्तांना उपलब्ध निधीतून पंचनामे करून तत्कालीन तहसिलदार नितिन देवरे यांच्या हस्ते अनुदानाचे धनादेश वाटप  करण्यात आले होते. मात्र त्याचवेळी तालुक्यात महसुल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. जवळपास 400 पंचनामे करण्यात आले होते. त्यापैकी 200 पुरग्रस्तांना पात्र ठरू शकतात  असे लिपिक हरिष भामरे यांनी सांगितले होते. या नुकसानग्रस्तांसाठी ऑगस्टम महिन्यातच तहसिल कार्यालयामार्फत 25 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने तब्बल तीन महिने उलटूनही पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे पुरग्रस्त अक्कलकुवा तहसिल कार्यालयात चकरा मारत आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणूकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यामूळे कामे रेंगाळली होती. पुन्हा आता राष्ट्रपदी राजवट लागू झाल्याने निधी कधी उपलब्ध होईल याकडे पुरग्रस्तांचे लक्ष लागून आहे.
 

Web Title: Disappointment among the sufferers after seeking help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.