लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : जामिया इशातुल उलुम संचलित अस्सलाम हॉस्पीटल गेल्या २५ वर्षांपासून अक्कलकुवा व परिसरात आरोग्य सेवा देत आहे. सुसज्ज लॅबसह या हॉस्पीटलमध्ये आधुनिक उपकरणे व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. या वेळी हॉस्पीटलला डिजिटल एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे.आधुनिक गरजेनुसार संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम मुहम्मद वस्तानवी व मौलाना हुजैफा वस्तानवी यांच्या प्रयत्नाने डिजिटल एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्यात आले. या मशीचा शुभारंभ मंगळवारी जामियाचे अध्यक्ष मैलाना गुलाम वस्तानवी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मौलाना गुलाम मुहम्मद वस्तानवी यांनी गरजू व आदिवासी रूग्णांना याचा लाभ होणार ंअसल्याचे सांगितले. मौलाना हुजैफा वस्तानवी व मौलाना उवेश वस्तानवी यांनी हॉस्पीटलला अत्याधुनिक करण्याचा संकल्प केला. या वेळी हॉस्पीटलचे डायरेक्टर कारी सुलेमान रंदेरा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.मसुद अहेमद, शेख अखलाक अहेमद यांनी जामिया प्रशासनाचे आभार मानले.
‘जामिया’मध्ये डिजीटल एक्स-रे मशीन कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:36 IST