नंदुरबार : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांचे खाजगी स्विय सहायक भगवान गिरासे हे सोमवारी पहाटे उच्छल रेल्वे स्थानकावर मिळून आले. दरम्यान, त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ते बोलण्याच्या मनस्थित फारसे नसल्याने काही बाबींचा उलगडा होऊ शकला नाही.माणिकराव गावीत यांच्यासह त्यांचा परिवार ३० मार्च रोजी काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. तेथे त्यांचे खाजगी स्विय सहायक तथा शैक्षणिक संस्थेत नोकरीस असलेले भगवान गिरासे हे तेथून सायंकाळी बेपत्ता झाले. याबाबत दादर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. याबाबत विविध चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. अखेर सोमवारी पहाटे साडेचार वाजता ते नवापूरनजीक उच्छल रेल्वे स्थानकावर आढळून आले. त्यांचे मावसभाऊ उत्तमसिंग राजपूत यांनी त्यांना घरी आणले. ते फारसे बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांच्याकडून अधीकची माहिती मिळू शकली नाही. त्यांची टक्कल केली असून भुवयांचे, मिशीचे व दाडीचे केस काढण्यात आले आहेत. हे कुणी व का केले याबाबत उलगडा होऊ शकला नाही. चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
भगवान गिरासे यांच्या बेपत्ताचे कारण सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:30 IST