शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे व नंदुरबार जिल्हा पर्यटनाचे ‘हब’ करणार : चेतक फेस्टीवलचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा फेस्टीवल हा राज्यातील प्रमुख पाच फेस्टीवलमध्ये राज्यशासनाने समाविष्ट केला असून आगामी 100 वर्षे हा फेस्टीवल यशस्वीपणे साजरा होईल असा विश्वास व्यक्त करीत, पर्यटन विभागाने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकासाकडे गांभिर्याने लक्ष घातले असून हा भाग पर्यटन हब बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री तथा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा फेस्टीवल हा राज्यातील प्रमुख पाच फेस्टीवलमध्ये राज्यशासनाने समाविष्ट केला असून आगामी 100 वर्षे हा फेस्टीवल यशस्वीपणे साजरा होईल असा विश्वास व्यक्त करीत, पर्यटन विभागाने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकासाकडे गांभिर्याने लक्ष घातले असून हा भाग पर्यटन हब बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केल़े सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलचे पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते रविवारी शानदार उद्घाटन झाल़े याप्रसंगी ते बोलत होत़े व्यासपीठावर माजीमंत्री आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ़ कुमुदिनी गावीत, दोंडाईचाच्या नगराध्यक्ष नयनकुंवर रावल, चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपाल रावल, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधिक्षक संजय पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एम़मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सरपंच भारतीबाई कोळी, रशियाच्या छायाचित्रकार कातिया डूज, जपानच्या शिष्टमंडळातील वाकायामा प्रिफेर गव्र्हमेंटचे योशियो यामाशिता, वाकायामा प्रिफेर गव्र्हमेंटच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे ओनिशी तात्सुनोरी आणि इतर जपानी मान्यवर उपस्थित राहणार आहेत़ आदी उपस्थित होत़े यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, पर्यटन विकासाच्या माध्यमातून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा:या प्रकाशा तीर्थक्षेत्र असो, रावलापाणी असो, उनपदेव असो, नंदुरबारचा इमाम बादशाह दर्गा, गजानन महाराज मंदिर, धुळ्यातील लळींग किल्ला, भामेर किल्ला असे विविध ठिकाणच्या विकासाचे कामे हाती घेण्यात आली आहेत़ तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून महाबळेश्वरच्या विकासाप्रमाणे तेथेही विकासासाठी प्रयत्न असून त्यासाठी यावर्षी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितल़े या दोन्ही जिल्ह्यातील पर्यटनाच्या कामाला गती यावी नव्हे, तर हा भाग पर्यटन हब म्हणून नावारूपाला यावा, यासाठी पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे मंजूर करण्यात आले असून लवकरच ते कार्यान्वित होईल असे त्यांनी सांगितल़े सारंगखेडा येथील चेतक महोत्सव आगामी 10 वर्षासाठी राज्य शासनाने एका संस्थेशी करार केला आह़े तो यशस्वी झाल्यास आगामी 100 वर्ष हा फेस्टीवल सुरूच राहिल़ राज्यशासनाने कायमस्वरूपी फेस्टीवल साजरा करण्यासाठी अजिंठा फेस्टीवल प्रमाणे या फेस्टीवलचा समावेश केला असून तसा अध्यादेशही काढल्याचे त्यांनी सांगितल़े यावेळी डॉ़ विजयकुमार गावीत यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विकासाच्या कल्पना मांडल्या़ प्रसंगी हजारोंच्या संख्येने पर्यटक व यात्रेकरू उपस्थित होत़े