लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील जवखेडाहुन धारेश्वरमार्गे गोगापूरकडे जाणाऱ्या रस्त्या नजीक असलेल्या नाल्याला पूर आल्याने जवखेडा ते धारेश्वर रस्ता वाहून गेल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना जीवमुठीत धरून पुढील प्रवास करावा लागत आहे.याबाबत असे की, शहादा तालुक्यात मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आले. शहादा तालुक्यातील जवखेडाहून धारेश्वरमार्गे गोगापूरकडे जाणाºया मार्गालगतच्या शेतशिवारातून वाहून येणारा नाला आहे. हा नाला धारेश्वर जवळील सुखनाई नदीला मिळतो. या नाल्यावर भराव करून शेतकरी ये-जा करणारे प्रवासी प्रवास करत असतात. परंतु मागील वर्षी ९ आॅगस्ट रोजी रात्री या नाल्याला पूर आल्याने रस्ताच वाहून गेल्याने जीव मुठीत धरून पुढील प्रवास करावा लागत आहे.जवखेडा येथून धारेश्वर व गोगापूरकडे जाण्यासाठी हा मार्ग ग्रामस्थ व शेतकºयांसाठी सोयीचा आहे. या परिसरातील ब्राह्मणपुरी, जवखेडा, भागापूर येथील ग्रामस्थांची शेतशिवारे आहेत. या ठिकाणी पूल नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना जीव मुठीत धरून शेतशिवारात जावे लागत असते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात या नाल्याला पाणी आले तर या नाल्यावरील रस्ता वाहून जात असल्याने शेतकºयांना व ग्रामस्थाना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. रस्ता वाहून गेल्या शेतकºयांना ट्रॅक्टर, बैल गाडी, शेतमालसाठी घेऊन जाणारे इतर वाहने घेऊन जाण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो.या रस्त्यावर एकूण दोन नाले आहेत. एक जवखेडा जवळील नाल्यावर पूल बांधला गेला असून, पुढच्या नाल्यावर पूल नसल्याने नाल्यावरील रस्ता वाहून गेल्याने त्रास सहन करावा लागत असतो. जवखेडा येथील स्मशान भूमी धारेश्वर येथे असल्याने त्यांना पावसाळ्यात पुलाअभावी अंत्ययात्रा नेताना वळण मार्गाने जाव लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
भराव वाहून गेल्याने धारेश्वर-गोगापूर रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:24 IST