धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे़ तूर्तास दोन गावे आणि १३६ पाड्यांवर पाणीटंचाईने तालुका पूर्णपणे बेजार झाला असून नदीनाले आटल्याने आदिवासी बांधव झऱ्यांचा आधार घेत आहेत़जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई निवारण कृती आराखड्यात तालुक्यातील २ गावे आणि १३६ पाड्यांचा समावेश आहे़ यापाड्यांवर हातपंप लावणे प्रस्तावित आहेत़ तर दोन पाड्यांवर सालाबादाप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा होणार आहे़ परंतू तूर्तास हातपंपांची कामेच सुरु झालेली नसल्याचे त्या-त्या गावातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे़ तालुका प्रशासनाकडे निधी पूतर्ता करण्यात आलेली असतानाही कामांना सुरुवात झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ तालुक्यातील बºयाच गावांमध्ये विंधन विहिरींची खोदाई करण्यासाठी आवश्यक असलेल्या कूपनलिका करणाºया छोट्या गाड्या कमी असल्याने या कामांमध्ये दरवर्षी विलंब होत आहे़ यातून नादुरुस्त हातपंपांचा प्रश्नही यंदा ऐरणीवर आला असून त्यांच्या दुरुस्तीचे पथक तालुक्यात नियुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाºया टंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीकडे काही ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा योजनांच्या खोलीकरणाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत़ त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़
पाणी टंचाईने धडगाव तालुका बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:36 IST