ग्राम सामाजिक परिवर्तनातून गावांचा विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:07 PM2019-09-15T12:07:38+5:302019-09-15T12:59:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून नीती आयोगाच्या तत्त्वानुसार विकासाचे काम होत आहे. त्याचे चांगले ...

Development of villages is possible through village social transformation | ग्राम सामाजिक परिवर्तनातून गावांचा विकास शक्य

ग्राम सामाजिक परिवर्तनातून गावांचा विकास शक्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून नीती आयोगाच्या तत्त्वानुसार विकासाचे काम होत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. ग्रामस्थांनी अभियानाला सहकार्य करावे. त्यातून त्यांची आणि गावाची प्रगती होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज भादवड, ता.नवापूर येथे केले. 
अमिताभ कांत यांनी नवापूर तालुक्यातील भादवड येथे भेट दिली. महाराष्ट ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून गावात होणा:या कामांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, गटविकास अधिकारी वर्षा फडोळ, गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, पिरॅमल फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक किशोर घरत, अभियानाच्या जिल्हा कार्यकारी योगिनी खानोलकर आदी उपस्थित होते. कांत यांनी शाळा वर्ग खोल्यांची पाहणी केली. वर्गावर जाऊन विद्याथ्र्यांशी संवाद साधला, अभ्यासक्रमाची माहिती घेतली.  डिजिटल साहित्याच्या वापरात दीक्षा अॅपचा वापर कसा केला जातो ते प्रत्यक्ष पाहिले. शालेय पोषण आहार, स्वच्छतागृह, नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा, नवीन वर्गखोल्या  पहिल्या आणि शिक्षकांशी शिकवण्याच्या पद्धती याबाबद्दल चर्चा केली. 
डॉ.राहुल चौधरी यांनी 100} पाठ्यपुस्तक, संक्रमण दर आणि आवश्यक वर्गखोल्या, स्वच्छतागृहे यांची माहिती दिली. यासोबतच जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी सोलर पॅनलची मागणीही केली. जुबेर तांबोळी यांनी शाळेची पटसंख्या 297 असून सर्वाना सोयी सुविधांयुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते सोबतच वर्गखोल्याची आवश्यकता सांगितली. नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेविषयी धिरज खैरनार यांनी माहिती दिली.  या शाळांच्या डिजिटलायजेशन मुळे शिकवणे सोपे झाले आहे असे मनोगत तेथील शिक्षकांनी व्यक्त केले. 
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या गावातील संस्थाना सोलरची जोडणी करण्यात आली असल्याचे अभियानाच्या जिल्हा कार्यकारी योगिनी खानोलकर यांनी माहिती दिली. जिल्हा परिषद केंद्रशाळा भादवड येथील विजय गावित, जगदीश गावित, राजश्री कुलकर्णी, धनवंत बैसाने, सुनंदा अहिरे, हरकलाल गांगुर्डे, सुनील वानखेडे, प्रमिला कोकणी, रंजना गावित, धिरज खैरनार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रय} केले.
सेंट्रल किचनला भेट 
अमिताभ कांत यांनी सेंट्रल किचनला भेट देऊन तेथील अन्न पदार्थांची चव घेतली. त्यांनी संपुर्ण यंत्रणेची माहिती घेतली व येथील कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. येथे तयार होणारे अन्न पौष्टीक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी एकलव्य इंग्रजी माध्यम शाळेला भेट देऊन विद्याथ्र्यांशी संवाद साधला. आपले शिक्षण यापेक्षाही सामान्य शाळेत झाले आहे. त्यामुळे एवढ्या सुंदर शाळेत शिकणारे विद्यार्थी भाग्यवान आहेत. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर आहे. येथील सुविधांचा लाभ घेऊन चांगले यश संपादन करा. जीवनात एकतरी छंद जोपासा आणि एक तरी खेळात नैपुण्य मिळवा, असे आवाहन त्यांनी विद्याथ्र्यांना केले. हॉकी स्पर्धेत यश मिळविणा:या खेळाडुंचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.

नंदुरबार जिल्ह्याला केंद्र शासनाच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. त्यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे व गणेश पराडके यांनी जिल्ह्यातील विकासासंदर्भातील समस्या मांडण्यासाठी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत जिल्ह्यातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यासाठी सीएफआरच्या माध्यमातून ज्या गावांना सामूहिक वनहक्क मिळाले आहेत त्यांच्या माध्यमातून स्थानिक रोजगारासाठी नियोजन करण्यात यावे, तोरणमाळ ग्रामपंचायतीमधील गावांच्या सामूहिक वन व्यवस्थापन समितींच्या माध्यमातून पर्यटनस्थळ विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा, नर्मदेतून मिळालेले 10 टीएमसी व तापीतून मिळालेले पाच टीएमसी पाणी उचलून अक्कलकुवा, धडगाव, शहादा व तळोदा तालुक्यातील सिंचन व पाण्याचा प्रश्न सोडवला जावा आदी या विषयांवर चर्चा करण्यात आली.
 

Web Title: Development of villages is possible through village social transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.