कोरोनाशून्य जिल्ह्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:28 PM2020-07-11T12:28:26+5:302020-07-11T12:28:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करुन प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीची अंमलबजावणी कठोरतेने करत जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा निर्धार ...

Determination of Coronation Free District | कोरोनाशून्य जिल्ह्याचा निर्धार

कोरोनाशून्य जिल्ह्याचा निर्धार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करुन प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीची अंमलबजावणी कठोरतेने करत जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा निर्धार पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला़ यावेळी विविध विषयांवर चर्चा करुन बाधितांची संख्या शून्य व्हावी याबाबतही चर्चा करण्यात आली़
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली़ प्रसंगी पालकमंत्री अ‍ॅड़ पाडवी यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना करुन उपाययोजनांचा आढावा घेतला़ बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि अविश्यांत पांडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री अ‍ॅड़ पाडवी यांनी प्रतिबंधीत क्षेत्रात संपर्क साखळीचा शोध आणि नियमांच्या अंमलबजावणीबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. स्वॅब तपासणीसोबत संसर्गावर नियंत्रण आणणे महत्वाचे आहे़ येत्या काळात पोलिसांची भूमिका महत्वाची असून कोरोनाबाबत जनजागृतीवर भर देण्यासोबतच सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, नागरिकांमध्ये आजाराबाबत जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या़
बैठकीदरम्यान पालकमंत्री पाडवी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्हा प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करीत असून नागरिकांनी कोरोनाच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कोरोना नियंत्रणासाठी शासन पातळीवर आवश्यक सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व यंत्रणांनी संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, असेही त्यांनी सांगितले़
जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून बºयाच बाधित व्यक्ती या एकाच कुटुंबातील किंवा त्यांच्या संपर्क साखळीतील आहेत. जिल्ह्यात प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णाची माहिती घेवून संपर्क साखळी शोधण्यावर भर देण्यात येत आहे. पोलीसांच्या मदतीला लवकरच कोतवाल आणि पोलीस पाटील यांची सेवा देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत दिली़

बैठकीत लग्नकार्यासाठी होणारी गर्दी कमी व्हावी यासाठी ग्रामीण भागात नागरिकांचे प्रबोधन करणे़ वाहनाने लग्नासाठी जाणाºया गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत.
ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बैठकीचे आयोजन करीत काही ज्येष्ठ नागरिकांकडे ग्रामस्थांसोबत संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात यावी.
जिल्ह्यातील विविध भागात बाहेर गावाहून येणाºया व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्यात यावे आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याचे निश्चित करण्यात आले़

शेतकºयांना बी-बियाणे व खतांसाठी शहरात यावे लागू नये यासाठी रेशन दुकानांच्या माध्यमातून कृषी निविष्ठा वितरीत करण्याचे नियोजन करण्याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या़ शेतकºयांना खताच्या योग्य वापराविषयी शेतकºयांना माहिती द्यावी. जिल्ह्यात युरीयाच्या उपलब्धतेबाबत कृषीमंत्र्यांसोबत चर्चा केली असून लवकरच युरियाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल, असे पालकमंत्री अ‍ॅड़ पाडवी यांनी बैठकीत उपस्थितांना सांगितले़

जिल्हाधिकारी कार्यालयातून झालेल्या या व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंगचे एकाच वेळी जिल्हा व तालुकास्तरावरील कार्यालयांमध्ये थेट प्रसारण झाले़ जिल्हा परिषदेत प्रोजेक्टर लावून अधिकारी व कर्मचाºयांनी बैठकीत सहभाग घेत विविध सूचना मांडून कामकाजाचा आढावा सादर केला़

Web Title: Determination of Coronation Free District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.