शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोटिसा बजावूनही मोकाट गुरांचा त्रास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:25 IST

शेतकरी संतप्त : तळोदा शहरालगतच्या शेतांमधील पिकांचे नुकसान

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : मोकाट फिरणा:या गुरांच्या बंदोबस्तासाठी पालिकेने पशुपालकांना चार दिवसांपूर्वी नोटीसा बजावूनही पालिकेच्या नोटीसींची दखल घेण्याऐवजी त्यास केराची टोपली दाखवत सर्रास शेतक:यांच्या पिकांचे नुकसान ही गुरे करीत असल्याची तक्रार शेतक:यांनी केली आहे. दरम्यान, एका शेतक:याने आपल्या उभ्या पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.मोकाट गुरे व वराहांमुळे शहरालगतच्या शेत शिवारातील शेतक:यांचा ऊस, केळी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार शेतक:यांनी पालिकेकडे केली होती. या पाश्र्वभूमिवर नगर पालिकेने चार               ते पाच दिवसांपूर्वी शहरातील                 25 वराह व पशुपालकांना गुरे व वराहांच्या बंदोबस्ताबाबत नोटीसी बजाविल्या होत्या. या शिवाय नोटीसीचा खुलासा तातडीने करण्याची सूचनादेखील या नोटीसीमध्ये केली होती. पालिकेच्या नोटीसीची तातडीने दखल घेण्याऐवजी सदर पशुपालकांनी या नोटिसीला केराची टोपली दाखविली असल्याचे चित्र आहे. कारण अजूनही ही मोकाट गुरे सर्रास शेतक:यांच्या शेतातील ऊस पिकाचे नुकसान करीत असल्याचा शेतक:यांचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी शहारतील मित्तलकुमार रामा टवाळे या शेतक:याने आपल्या अक्कलकुवा रोडवरील शेतातील उसाचे पिकाचे नुकसान मोकाट गुरांमुळे होत असल्याची तक्रार तळोदा पोलीस ठाण्यात केली आहे. एवढेच नव्हे तर या मोकाटगुरांचे पशुपालक मालकांबरोबरच रखवालदारासदेखील मारण्याची धमकी देत असतात. या प्रकरणी पशुपालकांचा बंदोबस्त करण्या ऐवजी पोलिसांनीदेखील साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहससे.ऊस, केळी ही शेतक:यांची बारमाही पिके आहेत. त्याच्या संगोपनासाठी शेतकरी आर्थिक खर्चाबरोबरच प्रचंड मेहनत घेऊन वाढवित असतो. मात्र मोकाट         गुरांच्या शेतातील संचारामुळे पीक उद्ध्वस्त होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी प्रचंड वैतागला आहे.          त्यांचा बंदोबस्त  करण्याऐवजी            या दोन्ही यंत्रणांनी अशा पशुपालकांपुढे अक्षरश: गुडघे टेकले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेवून संबंधितांना तंबी द्यावी, अशी शेतक:यांची मागणी आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतक:यांनी दिला आहे.