शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इमारत असूनही पाण्याची सुविधा नाही : नंदुरबार शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेल्या चार वर्षापासून मुलींचे वसतिगृह बांधण्यात आले आह़े परंतु येथे पाण्याची सुविधा नसल्याने हे वसतिगृह धुळखात आह़े परिणामी विद्यार्थिनींना वसतिगृह असतानाही इतरत्र जादा घरभाडे देऊन रहावे लागत आह़ेयेथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्याथ्र्यासाठी असलेल्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आह़े शासकीय तंत्रनिकेतन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेल्या चार वर्षापासून मुलींचे वसतिगृह बांधण्यात आले आह़े परंतु येथे पाण्याची सुविधा नसल्याने हे वसतिगृह धुळखात आह़े परिणामी विद्यार्थिनींना वसतिगृह असतानाही इतरत्र जादा घरभाडे देऊन रहावे लागत आह़ेयेथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्याथ्र्यासाठी असलेल्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आह़े शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असताना येथील इमारती तसेच कॉलेज कॅम्पसची स्थिती भुताटकी इमारती सारखी झाली आह़े या ठिकाणी 2009 मध्ये महाविद्यालयाचे बांधकाम करण्यात आले होत़े त्यानंतर सुमारे पाच वर्षानी येथे मुलींसाठी वसतिगृहदेखील बांधण्यात आले आह़े 62 खोल्यांचे असलेले हे वसतिगृह गेल्या अनेक वर्षापासून तसेच पडून आह़े या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने वसतिगृहाचा वापर निरुपयोगी वस्तू ठेवण्यासाठीच करण्यात येत असल्याचे दिसून येत आह़े या वसतिगृहाच्या भोवताली डोक्याबरोबर झुडपे वाढले आह़े तसेच वापरात नसल्याने धुळीचेही साम्राज्य निर्माण झालेले आह़े कॉलेज कॅम्पसमध्ये सुमारे चार कुपनलिका करण्यात आल्या आह़े परंतु वसतिगृहाच्या परिसरात कुपनलिकांना पाणी लागत नसल्याने या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होत आह़े तंत्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विविध जिल्ह्यातून विद्यार्थिनी येत असतात़ त्यामुळे शासनाकडूनही याची दखल घेत त्यांच्यासाठी वसतिगृह बांधण्यात आले होत़े परंतु त्याआधी पाणी, वीज, विद्यार्थिनींची सुरक्षितता या मुलभूत गोष्टींचे नियोजन होणे आवश्यक  होत़ेपरंतु तसे झाले नाही़ परिणामी लाखो रुपयांचे वसतिगृह बांधूनदेखील विद्यार्थिनींना परिसरात भाडय़ाने रुम घेऊन जादा घरभाडे मोजावे लागत असल्याच्या व्यथा विद्यार्थिनींकडून मांडण्यात येत           आह़े परिसरात अनेक नागरिकांकडून विद्याथ्र्यांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने घरे बांधण्यात आली आह़े विद्याथ्र्याना भाडय़ाने रुम देण्याचा व्यवसायदेखील अनेक रहिवाशांकडून सुरु करण्यात आला आह़े परंतु विद्यार्थी संख्या जास्त झाल्यास अनेक घर मालकांकडून ही संधी हेरत घरभाडे वाढविण्यात येत असत़े त्यामुळे अनेक विद्याथ्र्याची आर्थिक पिळवणूकदेखील होत असल्याचा आरोप करण्यात आला आह़े यात विद्यार्थिनींची व्यथा अधिकच बिकट आह़े विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाकडून वसतिगृह बांधण्यात आले असूनही ते वापरात नसल्याने आपल्या हक्काच्या सोयी-सुविधांपासून त्यांना वंचित रहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करुन पाण्याची व्यवस्था करुन त्वरीत वसतिगृह वापरास खुले करण्याची अपेक्षा         आह़े