शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

वंचित समाज घटकांनाही सत्तेत भागीदारी मिळावी : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:53 IST

महाराष्ट्रभर दौरा सुरू, लोकमत संवाद उपक्रमात विविध विषयांवर चर्चा

<p>नंदुरबार : महाराष्ट्रातील वंचित समाज घटकांना एकत्र करून आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आपला प्रय} आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण दौरा करीत आहोत. या वंचित समाज घटकांनाही सत्तेत सहभागी करून त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे हा आपला प्रामाणिक प्रय} असून आगामी निवडणुकीत पैशाला महत्त्व न राहता विचारांनाच महत्व येईल, असा दावा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ संवाद कार्यक्रमात बोलतांना केला.वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रेच्या निमित्ताने सध्या अॅड.प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. शुक्रवारी ते नंदुरबारात आले असता ‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळपणे संवाद साधला. ‘लोकमत’चे कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. मनोज शेलार, भूषण रामराजे उपस्थित होते. त्यांच्यासोबत माजी आमदार विजय मोरे, भारिपचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे कॉ.किशोर ढमाले उपस्थित होते.अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रेचा मूळ उद्देश स्पष्ट केला. राज्यात आतार्पयत 12 पेक्षा अधिक जिल्ह्यात यानिमित्ताने गेलो आहे. पंढरपुरात धनगर मेळाव्यापासून त्याला सुरुवात झाली. सर्वाना बरोबर घेण्याचा प्रय} आहे. जातीअंतर्गत आणि सामाजिक दृष्टीकोनातून वंचित असलेल्यांची मोट बांधली जात आहे. त्यात यश आले असून ही ताकद आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत नक्कीच दिसून येईल.  ख:या कार्यकत्र्याला संधी दिली जाईल, घराणेशाहीला हद्दपार करण्यात येईल. पैशाला महत्त्व राहणार नसून विचारांची लढाई आता लढली जाणार आहे. आतार्पयतच्या राज्यभरातील दौ:यात व्यापक पाठींबा मिळत आहे. 28 सप्टेंबला सोलापूरला व 2 ऑक्टोबरला औरंगाबादला मेळावा होणार आहे. शिक्षणाचे बदलते धोरण, राखीव जागा, कृषी धोरण, बेरोजगारी हे विषय घेवून या मेळाव्यांमधून जनजागृती केली जात आहे. राष्ट्रवादी पक्ष पूर्वी सेक्यूलर समजला जात होता, परंतु खासदार शरद पवार यांची बदलणारी भूमिका आणि आरएसएसकडे झुकण्याचे प्रमाण पहाता त्यांना सोबत घेण्याबाबत काही अटी असतील. काँग्रेस धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जातो, असेही त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच जागांवर आम्ही लढणार आहोत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आदी राज्यात देखील आगामी काळात जाणार आहोत. इतर राज्यांमध्येही चांगला पाठींबा आहे.शेतक:यांच्या प्रश्नांबाबत बोलताना अॅड.आंबेडकर यांनी सांगितले, आरएसएस अर्थात भाजपची संस्कृती मदत देणे या संकल्पनेतील नाही. त्यामुळे कजर्माफीचा प्रश्नच येत नाही. कजर्माफीची घोषणा, त्यानंतरचे फिरविण्यात आलेले निर्णय, 50 पेक्षा अधिक अध्यादेश हे कशाचे द्योतक आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.राज्य सरकार सर्वच आघाडींवर अपयशी ठरले आहे. शेतकरी आंदोलन यांना व्यवस्थित हाताळता आले नाही, शेतीचा खेळखंडोबा केला गेला. जलयुक्त अभियानातील कामांचे आता वाभाडे निघू लागले आहेत. शिक्षणाचे बदलते धोरण विद्याथ्र्याचे भवितव्य धोक्यात आणणारे आहे. गोवंशबंदीसह औद्योगिक धोरणातील धरसोडपणा यामुळे हे सरकार गोंधळी सरकार आहे, असेच म्हणावे लागेल. केंद्रातील मोदी सरकारदेखील यापेक्षा वेगळे नाही. केवळ घोषणा करणे, वल्गना करणे यापलिकडे त्यांना काही जमले नाही. देशातील वातावरण कधी नव्हे एवढे दहशतीचे झाले आहे. कुणाचीही हुकूमशाही जादा काळ चालत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. 2019 च्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून भाजपशी पर्यायाने मोदींशी दोन हात करण्यासाठी तयारीत राहावे असे आपण यापूर्वीदेखील बोललो होतो आताची परिस्थितीही तेच सांगत आहे. राज्यातील भाजप सरकारला मराठय़ांना ख:या अर्थाने आरक्षण लागू करायचे नाही. म्हणूनच चर्चेसाठी सर्व पक्षांना एकत्र बोलविण्याचे मुख्यमंत्री नाटक करीत आहेत. जर सत्ता त्यांच्या हाती आहे तर प्रश्न सोडविण्यास ते समर्थ असले पाहिजे पण, ती परिपक्वता मुख्यमंत्र्यांकडे नसल्याचा आरोपही अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केला.