शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील डर्टी पॉईंट शोधत पालिकेकडून डेंग्यू निमरुलनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात वाढीस लागलेल्या डेंग्यूच्या साथीला अटकाव व्हावा यासाठी पालिकेकडून आरोग्य व स्वच्छता विषयक सभा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात वाढीस लागलेल्या डेंग्यूच्या साथीला अटकाव व्हावा यासाठी पालिकेकडून आरोग्य व स्वच्छता विषयक सभा शनिवारी घेण्यात आली होती़ यातील निर्णयानुसार शहरातील डर्टी पॉईंट शोधूून स्वच्छता करण्याच्या मोहिमेस रविवारपासून प्रारंभ करण्यात आला़  डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले 100 च्या जवळपास शहरातील विविध दवाखान्यात उपचार घेत आहेत़ रुग्णांची वाढती संख्या पाहून आरोग्य यंत्रणा सव्रेक्षण करत असताना दुसरीकडे पालिकेने नियोजन सभा बोलावली होती़ शनिवारी उपनगराध्यक्ष परवेज खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या स्वच्छता व आरोग्य विषयक सभेत मुख्याधिकारी डॉ़ बाबुराव बिक्कड, आयएमएचे अध्यक्ष डॉ़ राजेश वळवी, कार्यालय अधिक्षक प्रितम ढंढोरे, आरोग्य निरीक्षक दिपक पाटील, राजेश परदेशी यांच्यासह स्वच्छता करणारे मुकादम, मक्तेदार व कर्मचारी उपस्थित होत़े सभेत डेंग्यूसदृश तापापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी जनजागृती करण्याबाबत भर देण्याचे नियोजन करण्यात आल़े शहरात धूरफवारणी व औषध फवारणी करण्यासाठी 4 पथकांची निर्मिती करण्याच्या सूचना करण्यात येऊन तीन दिवसात शहरातील सर्व ठिकाणी धूर आणि औषध फवारणी करण्याची ताकीद देण्यात आली़ आरोग्य विभाग घरोघरी स्वच्छता विषयक पत्रकांचे वाटप करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ स्वच्छता विषयक सभेतील सूचनेनुसार पालिका कर्मचारी डर्टी पॉईंटचे शहरात सव्रेक्षण करत असल्याची माहिती देण्यात आली आह़े यानुसार शहरात नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार 15 ठिकाणे समोर आल्याची माहिती देण्यात आली आह़े याठिकाणी साफसफाई करण्यात येत असल्याची माहिती आह़े फवारणी आणि रासायनिक प्रक्रिया करुन ह्या जागा स्वच्छ करुन पालिका प्रशासन डेंग्यू सदृश तापाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आह़े 

शहरातील 50 ठिकाणावरुन पालिका आरोग्य विभागाकडून कच:याचे संकलन केले जात़े ओला आणि सुका असे वर्गीकरण करुन हा कचरा डंपिंग ग्राउंडवर पाठवण्यात येतो़ परंतू याव्यतिरिक्त कचरा पडून असल्याने तेथे डासांची निर्मिती होणा:या ठिकाणांचे सव्रेक्षण करण्यात येणार आह़े ही ठिकाणे डर्टी पॉईंट म्हणून ओळखली जाणार आहेत़ पालिका कर्मचा:यांनी अशा जागांचे सव्रेक्षण केल्यानंतर स्वच्छता पथक तातडीने तेथे पोहोचून कच:याची विल्हेवाट लावणार आह़े 

खासदार हीना गावीत यांनाही डेंग्यू 

खासदार डॉ़ हीना गावीत यांनाही डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आह़े खासदार डॉ़ गावीत यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून डेंग्यू झाल्याचे स्पष्ट केले आह़े त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े रविवारी सकाळपासून बरे वाटत नसल्याचे त्यांनी त्यात म्हटले होत़े यानंतर दुपारी डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट केल़े सोशल मिडियावरील त्यांच्या या मेसेजमुळे त्यांना अनेकांनी मेसेजद्वारे काळजी घेण्याचे आवाहन केल़े