शहरातील डर्टी पॉईंट शोधत पालिकेकडून डेंग्यू निमरुलनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:58 AM2019-10-14T11:58:53+5:302019-10-14T11:59:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात वाढीस लागलेल्या डेंग्यूच्या साथीला अटकाव व्हावा यासाठी पालिकेकडून आरोग्य व स्वच्छता विषयक सभा ...

Dengue Nimrulan attempts to find Dirty Point in city | शहरातील डर्टी पॉईंट शोधत पालिकेकडून डेंग्यू निमरुलनाचा प्रयत्न

शहरातील डर्टी पॉईंट शोधत पालिकेकडून डेंग्यू निमरुलनाचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात वाढीस लागलेल्या डेंग्यूच्या साथीला अटकाव व्हावा यासाठी पालिकेकडून आरोग्य व स्वच्छता विषयक सभा शनिवारी घेण्यात आली होती़ यातील निर्णयानुसार शहरातील डर्टी पॉईंट शोधूून स्वच्छता करण्याच्या मोहिमेस रविवारपासून प्रारंभ करण्यात आला़  
डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले 100 च्या जवळपास शहरातील विविध दवाखान्यात उपचार घेत आहेत़ रुग्णांची वाढती संख्या पाहून आरोग्य यंत्रणा सव्रेक्षण करत असताना दुसरीकडे पालिकेने नियोजन सभा बोलावली होती़ 
शनिवारी उपनगराध्यक्ष परवेज खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या स्वच्छता व आरोग्य विषयक सभेत मुख्याधिकारी डॉ़ बाबुराव बिक्कड, आयएमएचे अध्यक्ष डॉ़ राजेश वळवी, कार्यालय अधिक्षक प्रितम ढंढोरे, आरोग्य निरीक्षक दिपक पाटील, राजेश परदेशी यांच्यासह स्वच्छता करणारे मुकादम, मक्तेदार व कर्मचारी उपस्थित होत़े 
सभेत डेंग्यूसदृश तापापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी जनजागृती करण्याबाबत भर देण्याचे नियोजन करण्यात आल़े शहरात धूरफवारणी व औषध फवारणी करण्यासाठी 4 पथकांची निर्मिती करण्याच्या सूचना करण्यात येऊन तीन दिवसात शहरातील सर्व ठिकाणी धूर आणि औषध फवारणी करण्याची ताकीद देण्यात आली़ आरोग्य विभाग घरोघरी स्वच्छता विषयक पत्रकांचे वाटप करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ 
स्वच्छता विषयक सभेतील सूचनेनुसार पालिका कर्मचारी डर्टी पॉईंटचे शहरात सव्रेक्षण करत असल्याची माहिती देण्यात आली आह़े यानुसार शहरात नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार 15 ठिकाणे समोर आल्याची माहिती देण्यात आली आह़े याठिकाणी साफसफाई करण्यात येत असल्याची माहिती आह़े फवारणी आणि रासायनिक प्रक्रिया करुन ह्या जागा स्वच्छ करुन पालिका प्रशासन डेंग्यू सदृश तापाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आह़े 

शहरातील 50 ठिकाणावरुन पालिका आरोग्य विभागाकडून कच:याचे संकलन केले जात़े ओला आणि सुका असे वर्गीकरण करुन हा कचरा डंपिंग ग्राउंडवर पाठवण्यात येतो़ परंतू याव्यतिरिक्त कचरा पडून असल्याने तेथे डासांची निर्मिती होणा:या ठिकाणांचे सव्रेक्षण करण्यात येणार आह़े ही ठिकाणे डर्टी पॉईंट म्हणून ओळखली जाणार आहेत़ पालिका कर्मचा:यांनी अशा जागांचे सव्रेक्षण केल्यानंतर स्वच्छता पथक तातडीने तेथे पोहोचून कच:याची विल्हेवाट लावणार आह़े 


खासदार हीना गावीत यांनाही डेंग्यू 

खासदार डॉ़ हीना गावीत यांनाही डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आह़े खासदार डॉ़ गावीत यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून डेंग्यू झाल्याचे स्पष्ट केले आह़े त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े रविवारी सकाळपासून बरे वाटत नसल्याचे त्यांनी त्यात म्हटले होत़े यानंतर दुपारी डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट केल़े सोशल मिडियावरील त्यांच्या या मेसेजमुळे त्यांना अनेकांनी मेसेजद्वारे काळजी घेण्याचे आवाहन केल़े 
 

Web Title: Dengue Nimrulan attempts to find Dirty Point in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.