शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

नंदुरबारात सामाजिक सलोख्यातून ऐक्याचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयोध्या निकालाच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारसह जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. सर्वत्र व्यवहार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयोध्या निकालाच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारसह जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. सर्वत्र व्यवहार सुरळीत होते. नंदुरबारात मात्र सकाळी काही काळ व दुपारनंतर अनेक भागात शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. सोशल मिडियावर लक्ष ठेवण्यासाठी मात्र सायबर सेल 24 तास कार्यरत होता. सर्वोच्च न्यायालयात सकाळी साडेदहावाजेपासून निकाल वाचणास सुरुवात झाल्याच्या आधीपासूनच नंदुरबारातील विविध भागात शुकशुकाट होता. अनेकांनी सकाळी आपली दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने उघडलीच नाही. निकालानंतर अर्थात साडेअकरा वाजेनंतर एकुण परिस्थिती पाहून व्यापा:यांनी आपले दुकाने उघडली. त्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले. परंतु बाजारात अपेक्षीत गर्दीच नसल्याचे चित्र होते. दुपारी तीन वाजेनंतर पुन्हा अनेक भागातील व्यापारी पेठेत शुकशुकाट दिसून येत होता. बसस्थानकातही तुरळक गर्दीविविध माध्यमांद्वारे करण्यात आलेले आवाहन आणि सोशल मिडियावरील व्हायरल झालेल्या पोस्टमुळे ग्रामिण भागातील जनतेने देखील नंदुरबारात बाजारासाठी येणे टाळले. शिवाय दुसरा शनिवार असल्याने शासकीय सुट्टी, बँकांना सुट्टी आणि शाळांना देखील सुटय़ा असल्यामुळे बसस्थानक परिसरात दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत होता. अनेक स्थानिक व लांब पल्ल्याच्या गाड्य़ांमध्ये तुरळक प्रवासी प्रवास करतांनाचे चित्र होते. त्याचा फटका महामंडळाच्या उत्पन्नावर झाला. असे असले तरी नंदुरबार आगाराने एकही फेरी रद्द केली नाही किंवा फे:या कमी केल्या नसल्याचे सांगण्यात आले. पक्ष कार्यालयांमध्येही..शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये देखील नेहमीप्रमाणेच कामकाज सुरू होते. शिवसेना, भाजप यांच्या कार्यालयातील कामकाज नेहमीप्रमाणे दिसून आले. पक्ष कार्यालयातील दूरचित्रवाणी संचावर मात्र निकालाचे प्रेक्षेपण पाहिले जात होते. सायंकाळी देखील तीच परिस्थिती दिसून आली. चौकाचौकात बंदोबस्तपोलिसांनी मात्र 60 पेक्षा अधीक पॉईंट तयार करून त्या ठिकाणी बंदोबस्त तैणात केला होता. 800 पोलीस कर्मचारी, 600 होमगार्ड, 60 अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी असा बंदोबस्त तैणात होता. यात सार्वजनिक चौक, संवेदनशील भाग, धार्मिक परिसर आणि राजकीय पक्ष कार्यालयांचा समावेश होता. प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी, दोन होमगार्ड तैणात होते. शिवाय संवेदनशील भाग पाहून संख्या अधीक होती, अधिकारीही तैणात होते. शहरात येणा:या चारही प्रमुख मार्गावर वाहनांवर नजर ठेवली जात होती. पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस ठाण्यांचे निरिक्षक यांची गस्ती वाहने व पथके बंदोबस्तावर नजर ठेवून होते.सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिका:याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता न्यायदंडाधिकारी यांनी त्यास 13 नोव्हेंबर्पयत स्थानबद्द करण्याचे आदेश दिले. पोलिसांचा सायबर सेल देखील सक्रीय होता. सेलमधील कर्मचारी दिवसभर सोशल मिडियावर लक्ष ठेवून होते. अफवा पसरविण्यात समाज माध्यमातील चर्चा आणि संदेश कारणीभूत ठरतात. ही बाब लक्षात घेता पोलिसांनी आधीपासूनच शांतता समिती बैठका आणि इतर माध्यमातून आवाहन केले होते. गुन्हेही दाखल झाले आणि नोटीसाही बजावण्यात आल्याने या विषयावर कुणीही फारशा पोस्ट टाकल्या नसल्याचे चित्र होते. शिवाय अनेक व्हॉट्सअप ग्रृपने सेटींग बदल करून घेतल्याने पोस्ट फॉरवर्ड करणे आणि पसरविण्याचे प्रकार देखील कमी होते. ईद ए मिलाद व आयोध्या निकाल या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर्पयत फौजदारी संहितेचे कलम 144 अर्थात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी हे आदेश लागू केले आहेत. निकालानंतर टिका टिप्पणी करणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल व संबधीत व्यक्ती कारवाईस पात्र राहिल. जमाव करून थांबणे, सोशल मिडियावर धार्मिक भावना दुखावतील असे संदेश प्रसारीत करणे, गुलाल उधळणे, फटाके फोडणे, सामुहिक आरती, नमाज पठण, मिरवणूक, रॅली आदींना प्रतिबंध करण्यात आला आहे. ईद ए मिलाद निमित्त निघणा:या मिरवणुका या शांततामय मार्गाने निघतील तसेच न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, सामजिक व धार्मिक संघटना राखतील आणि कायद्याचे पालन करतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली आहे. आयोध्या निकालाच्या पाश्र्वभुमीवर पोलीस दलातर्फे गेल्या आठ दिवसांपासून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. निकाल कुठलाही लागला तरी त्याबाबत सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त होऊ नये, अफवा पसरू नये यासाठी नागरिकांमध्ये जावून, शांतता समितीच्या बैठका घेवून प्रबोधन करण्यात आले. त्याचा उपयोग चांगला झाला. नागरिकांनी संयम बाळगला. जिल्हावासीय संयमशील आहेत त्याचा प्रत्यय पुन्हा आला. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही असेच सहकार्य राहू द्यावे. सोशल मिडियावरही लक्ष ठेवून आहोत. आजच एकावर कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. -महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, नंदुरबार.