शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशानजीक पिस्तुलचा धाक दाखवून ट्रकसह 49 लाखांचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गुजरातमधील 12 चाकी ट्रकसह 49 लाखाचा ऐवज प्रकाशा, ता.शहादा येथून चौघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लंपास केल्याची घटना 30 मार्च रोजी घडली. याबाबत गुरुवार, 4 एप्रिल रोजी रात्री शहादा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.ट्रकचालक आनंद उर्फ पिंडी ओंकार गिरी रा.माजलपूर ( गुजरात) याने शहादा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गुजरातमधील 12 चाकी ट्रकसह 49 लाखाचा ऐवज प्रकाशा, ता.शहादा येथून चौघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लंपास केल्याची घटना 30 मार्च रोजी घडली. याबाबत गुरुवार, 4 एप्रिल रोजी रात्री शहादा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.ट्रकचालक आनंद उर्फ पिंडी ओंकार गिरी रा.माजलपूर ( गुजरात) याने शहादा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 18 मार्च रोजी ट्रकने (क्रमांक जी.एल.20 यू-5399) ओरिसा येथे माल नेला होता. 23 मार्च रोजी माल पोहोचवून 24 मार्चला तेथून अॅल्युमिनिअम वायरचा माल घेऊन गुजरातकडे परत येत असताना 30 मार्च रोजी प्रकाशा पासून एक किलोमिटर अंतरावर एका पांढ:या रंगाच्या गाडीने त्याला थांबवले. गाडीतील चौघांनी ट्रकमधे काय माल आहे अशी विचारपूस करून मालाची पावती मागितली. तसेच बोलता बोलता त्यातील एकाने आनंदच्या मानेवर जोरदार मार देऊन त्याला गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले. तसेच त्याच्या खिशातील आठ हजार 500 रुपये रोख व 500 रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून व मारून टाकण्याची धमकी देऊन   सुमारे 10 ते 12 तासांचा प्रवास     करुन अज्ञातस्थळी घेऊन गेले. तेथून दुस:या दिवशी रात्री पुन्हा गाडीत टाकून धुळे टोलनाक्याजवळ फेकून दिले. तेथून त्याने प्रकाशा गाठले.   मात्र तेथे ट्रक आढळून न आल्याने    त्याने ट्रकसह 49 लाख 22 हजार   552 रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद शहादा पोलिसात दिली.  यात आठ लाखाचा 12 चाकी ट्रक, 41 लाख 13 हजार 552 रुपये किमतीची अॅल्युमिनिअमची तार, आठ हजार 500 रुपये रोख व 500 रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमालाचा समावेश आहे.